आज दिवसभरातील महत्त्वाच्या 5 बातम्या

आज दिवसभरातील महत्त्वाच्या 5 बातम्या

आज दिवसभरात या 5 महत्त्वाच्या बातम्यांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

- उध्दव ठाकरे अमित शहा यांची संयुक्त सभा गांधीनगरमध्ये

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता प्राचाराच्या आणि सभांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि अमित शहा यांची संयुक्त सभा गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

- प्रविण गायकवाड यांचा मुंबईत कांग्रेस प्रवेश

कांग्रेस निवडणूक स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रविण गायकवाड मुंबईत काँग्रेस प्रवेश करणार आहेत. तर प्रविण गायकवाड यांना पुण्यात उमेदवारी देणार असल्याचं सांगण्य़ात येत आहे.

- मोदींच्या चित्रपटावर निवडणुक आयोगासमोर सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपीक सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यात ऐन निव़डणुकांच्या दरम्यान हा रिलीज करण्यात येणार असल्यामुळे आज त्यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे

- भिमआर्मी प्रमुख चंद्रशेखर यांचा वाराणसी येथे रोडशो

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. याच पाश्वभूमिवर भिमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा वाराणसीमध्ये रोड शो होणार आहे.

- सपना चौधरी या मनोज चौधरीला भेटणार

सपना चौधरी राजकारणात येणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं असताना आता त्या भाजपच्या मनोज चौधरी यांना भेटणार आहे. त्यामुळे आता तिचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

First published: March 30, 2019, 7:38 AM IST

ताज्या बातम्या