बेस्ट कर्मचाऱ्यांची पत्रकार परिषद
बेस्ट कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही आहे. त्यामुळे या विरोधात मंगळवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनेतर्फे याविरोधात पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा
धुळ्यात भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. त्यासाठी धुळ्यामध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे.
रत्नागिरीत खेडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा
खेड येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुनिल तटकरे उपस्थित राहणार आहे. यावेळी व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
इम्तियाज जलील औरंगाबादमधून लोकसभा लढवणार
एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून इम्जियाज जलील यांना औरंगाबादची उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी रात्री त्यांना ही उमेदवारी देण्यात आली. इम्जियाज जलील यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे तर काँग्रेसचे सुभाष झांबड मैदानात आहेत.