आज दिवसभरातील या 5 घडामोडींकडे असणार देशाचं लक्ष

आज दिवसभरातील या 5 घडामोडींकडे असणार देशाचं लक्ष

आज दिवसभरात घडणाऱ्या या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

रविवारी खऱ्या अर्थाने लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमिवर आता उमेदवारांचा लोसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबगही सुरू झाली आहे. सोमवारी प्रितम मुंडे, नितीन गडकरी, नाना पटोले उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यानंतर प्रचाराच्या मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

शिलकुमार शिंदे ,  प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण हे नेतेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर देखील अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींवर देशाचं लक्ष असणार आहे.

सोमवादी संपूर्ण देशभरात रंगपंचमीचा सण साजरा होणार आहे. यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी जाहिरनामा प्रसिध्द होणार आहे. सोमवारी मुंबईत हा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या जाहिरनाम्यात कोणती आश्वासन देण्यात येतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रचारांच्या  फैरी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे याच पार्श्वभूमिवर सोमवारी अहमदनगर दौऱ्यावर आहेत.

First published: March 25, 2019, 6:29 AM IST

ताज्या बातम्या