'या' आहेत आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

'या' आहेत आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील या महत्त्वाच्या बातम्यांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

रावेर लोकसभा मतदारसंघाचे रक्षा खडसे यांची प्रचारसभा

लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रचारासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे हे उपस्थित राहणार आहेत.

औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 7 वाजता सभा

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबादमध्ये असणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमळनेर इथं सभा

जळगावच्या अमळनेर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजता ही सभा घेण्यात येणार आहे.

अमित शहा यांची बारामतीमध्ये सभा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बारामतीमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये अमित शहा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे.

वंचित बहुजन आघाडी यांची औरंगाबाद शहरात सभा

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे.

First published: April 19, 2019, 7:40 AM IST

ताज्या बातम्या