आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्यांकडे देशाचं लक्ष

आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्यांकडे देशाचं लक्ष

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता काँग्रेसनेदेखील कंबर कसली आहे. प्रचाराची रणधुमाळीच सुरू झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गाँधी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. नागपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या जाहर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे

  • Share this:

नागपूरमध्ये राहूल गांधी यांची संध्याकाळी 4 वाजता  सभा ​

- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता काँग्रेसनेदेखील कंबर कसली आहे. प्रचाराची रणधुमाळीच सुरू झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गाँधी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. नागपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या जाहर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

केरळमधील वायनाड येथे राहूल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करणार

- आज महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याआधी राहुल गांधी हे केरळमधील वायनाड इथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

- भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्ध्यामध्ये सभा होणार आहे. त्यामुळे यावेळी ते विरोधकांवर काय लक्ष करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पंढरपूरमध्ये रणजितसिंह निंबाळकरांसाठी जाहीर सभा

- भाजपचे माढाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी पंढरपूरमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी दिग्गज नेते व्यासपिठावर उपस्थित असणार आहेत.

उस्मानाबादच्या उमरगामध्ये शरद पवारांची सभा

- सकाळी 10च्या सुमारासा शरद पवार हे उमरगामध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन

- रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज होणार आहे. यासाठी अनेक प्रसिद्ध एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अन्य दिग्गज उपस्थित राहणार आहे.

 

First published: April 4, 2019, 7:21 AM IST

ताज्या बातम्या