पुण्यातील पुरानंतरची स्थिती ते पवारांची ईडी चौकशी, आज दिवसभरातील महत्त्वाच्या 5 बातम्या

पुण्यातील पुरानंतरची स्थिती ते पवारांची ईडी चौकशी, आज दिवसभरातील महत्त्वाच्या 5 बातम्या

पावसाचे अपडेट, राजकारण, क्रिडा ते मनोरंजन क्षेत्रातील आज दिवसभरातील या महत्त्वाच्या 5 बातम्यांकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : आज दिवसभरातील या महत्त्वाच्या 5 बातम्यांकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.

-पुण्यातल्या पुरानंतरच्या घडामोडींवर लक्ष असणार

- मान्सूनचा परतीचा प्रवास लांबलणीवर...ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला होणार सुरुवात, स्कायमेटचा अंदाज

- शरद पवार जाणार मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात

- शरद पवारांच्या ईडी ऑफिसच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अलर्ट, कलम 144 लागू

- आजपासून विधानसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आजपासून म्हणजेच 27 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

- पीएमसी खातेदारांना आता 1 हजार ऐवजी 10 हजार रूपये काढता येणार  आहेत. रिझर्व बॅंकेनं घातलेल्या निर्बंधांमध्ये बदल केला

- चांद्रयान-2 मधील ऑर्बिटर व्यवस्थित काम करत आहे. पण विक्रम लँडरबरोबर संपर्क प्रस्थापित होऊ शकला नसल्याचं भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख के.सिवन यांनी स्पष्ट केलं आहे.

- जायकवाडी धरणात पाण्याचा फ्लो वाढतोय, मराठवाड्यात अलर्ट

- जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर सोयगाव आणि जामनेर तालुक्यात कांग नदीवरील कांग धरणाची भिंती फुटण्याची स्थिती, हाय अलर्ट

- ग्रामीण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, लक्ष ठेवणं गरजेचं

- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी काश्मीरमध्ये मोहीम अधिक तीव्र करण्याचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी इशारा दिला आहे.

- 'पाकसोबत क्रिकेट खेळायला परवांगी दिल्यास रात्री दहशतवाद आणि दिवसा क्रिकेट असा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जाईल.' परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी क्रिकेट मुद्यावरून फटकारलं.

- काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. सलमान कोर्टात हजर न राहिल्यास त्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे.

SPECIAL REPORT : लोकं आता 'हे' गाव सोडून चालले, सरकार आता तरी लक्ष्य देईल का?

Published by: Renuka Dhaybar
First published: September 27, 2019, 7:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading