दानवेंना धक्का देत खोतकरांना संधी मिळणार? आजच्या 5 मोठ्या बातम्या

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 07:04 AM IST

दानवेंना धक्का देत खोतकरांना संधी मिळणार? आजच्या 5 मोठ्या बातम्या

- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोव्यातल्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे मनोहर पर्रिकरांच्या प्रकृती अस्वास्थ्य तर दुसरीकडे काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. मात्र, काँग्रेस सत्ता स्थापन करू शकत नाही. पर्रिकर सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे काँग्रेस सरकार सत्ता स्थापनेचा दावा करू शकत नसल्याचं भाजपच्या विनय तेंडुलकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविवारी यावर काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.


- औरंगाबाद आणि नाशिकमधे रविवारी शिवसेना-भाजप युतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत दोन्ही विभागांतील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.


- जालन्याच्या जागेवर दावा ठोकणाऱ्या अर्जुन खोतकरांची बंडाची तलवार म्यान केली असल्याच्या चर्चा आहेत. पण यावर औरंगाबादमधे मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत दिलजमाईची बैठक होणार आहे. त्यामुळे रविवारी जालन्याच्या जागेवर खोतकर की दानवे हे स्पष्ट होईल.

Loading...


- पश्चिम रेल्वेचा दादर फुलमार्केटमधील पुलाला जोडणारा रॅम्प आणि जिना तात्पुरता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 17 मार्चपासून 29 तारखेपर्यंत 13 दिवस हा पूल बंद राहणार आहे.


- वंचित आघाडीकडून औरंगाबादमधून इम्तियाज जलिल यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. रविवारी याची अधिकृत घोषणा होणार असल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2019 07:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...