युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार; आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार; आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील या हमत्त्वाच्या बातम्यांकडे सर्व देशाचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

महाराष्ट्रात 2019 लोकसभा निवडणूकीसाठी युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार आहे. या महासभेला मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. युतीच्या या पहिल्या प्रचारसभेची कोल्हापुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुकांसाठी संपूर्ण देशभरात आता प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातही आता निवडणुकांचे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. लोकसभेमध्ये भरपूर यश मिळावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहेत.


कराड इथे राष्ट्रवादी-काँग्रेस यांची प्रचार सभा संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शरद पवार, पृथ्वाराज चव्हाण आणि उदयराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.


कोल्हापूरात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे रविवारी ते कोणता मोठा निर्णय घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.


स्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची येत्या निवडणूकीत तिकीट कापल्याने नाराज कार्यकर्ते दादर येथील बाळासाहेब स्मारका समोर मुक आंदोलन करणार आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी भर सभेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2019 06:23 AM IST

ताज्या बातम्या