S M L

माधव भंडारी म्हणतात, आज इंधनाचे दर तर कमीच

Updated On: Sep 8, 2018 07:22 PM IST

माधव भंडारी म्हणतात, आज इंधनाचे दर तर कमीच

धुळे, 08 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून सतत इंधनाची दरवाढ सुरूच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही पुन्हा वाढ झालीये. पण ही वाढ भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना काही दिसत नाहीये. कारण 'देशातील पेट्रोल डीझेलचे दर हे काँग्रेसच्या सत्तेपेक्षा आज कमीच' असं अजब विधान माधव भंडारी यांनी केलंय. इंधानाच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय पण त्याचंही राजकारण करण्याचा प्रयत्न माधव भंडारी यांनी केला अशी चर्चा आहे.

पेट्रोल दरवाढीच्या नावाखाली काँग्रेस ढोंग करीत असल्याची टीका माधव भंडारी यांनी केलीये. राफेल खरेदीवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचे नेते जे आरोप करतायेत ते अतिशय पोरकटपणाचे आहेत. देशाच्या संरक्षण व्यवस्थेला हाणी पोहचविण्याचे राजकारण काँग्रेस आणि राहुल गांधी जाणिवपूर्वक करत असल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे.

2019 च्या निवडणुकांमध्ये दारुण पराभव होणार असल्याच दिसत असल्याने आपल्या अस्तित्वासाठी काँग्रेसची खेळी असल्याचं म्हणत भंडारी यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचीही खिल्ली उडवली.

तर आज मुंबईत पेट्रोल 87 रुपये 86 पैसे तर डिझेल 77 रुपये 7 पैसे प्रतिलीटर इतकं झालंय. त्यामुळे सामान्य नागरिकांध्ये चिंतेचं वातावरण निर्माण आहे. आज पेट्रोलच्या दरात 32 पैसे तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ झालीये. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागलीये.

 

Loading...
Loading...

VIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का?, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2018 07:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close