महागाईविरोधात आज शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन

महागाईविरोधात आज शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन

वाढत्या महागाईविरोधात शिवसेना आज राज्यभर आंदोलन करणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात, हे आंदोलन करण्यात येतंय.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : वाढत्या महागाईविरोधात शिवसेना आज राज्यभर आंदोलन करणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात, हे आंदोलन करण्यात येतंय. प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येतंय. मुंबईतही वेगवेगळ्या बारा ठिकाणी शिवसेना आंदोलन करणार आहे. शिवसेनेच्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग असणार आहे. ज्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेटच कोलमडून गेलंय. त्यांच्या निषेधार्त हे आंदोलन असणार आहेत. शिवसेनेच्या या आंदेलनाचा किती राजकिय परिणाम होणार आहे. हे येत्या काही दिवसांत स्पष्टं होईल.

राज्यात आणि केंद्रात शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी असूनही हे आंदोलन केलं जातंय. त्यामुळे शिवसेना खरंच सत्तेत आहे का, असाही प्रश्न विचारला जातोय. त्यावर शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी जनतेच्या प्रश्नावर आम्ही यापुढेही आवाज उठवत राहणारच, असं स्पष्टीकरण शिवसेनेतर्फे देण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 10:02 AM IST

ताज्या बातम्या