गुजरातमध्ये राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतलं ; आमदारांशीही संवाद साधणार

गुजरातमध्ये राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतलं ; आमदारांशीही संवाद साधणार

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर आलेत. गुजरात विधानसभा निकालानंतर राहुल गांधी प्रथमच गुजरातच्या दौऱ्यावर आलेत. गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर आज त्यांनी सर्वात आधी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

  • Share this:

23 डिसेंबर, अहमदाबाद : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर आलेत. गुजरात विधानसभा निकालानंतर राहुल गांधी प्रथमच गुजरातच्या दौऱ्यावर आलेत. गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर आज त्यांनी सर्वात आधी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यासाठी खास फुलांनी सजलेली थाली घेऊन ते मंदिरात आले होते. याच मंदिरात राहुल गांधींच्या धर्मासंबंधीच्या नोंदीवरून भाजपने शेरेबाजी केली होती. राहुल गांधी हे हिंदु नसल्याची आवई भाजपने उठवली होती. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी हे फक्त शिवभक्तच नाहीतर 'जनेऊधारी' हिंदु असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. त्याच मंदिरात आज पुन्हा राहुल गांधींनी जाऊन दर्शन घेतलं.

प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या 'टेम्पल रन'लाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी दर्शन घेतलेल्या बहुतांश मंदिर परिसरातील मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत. म्हणूनच गुजरात निकालानंतर राहुल गांधींनी सर्वप्रथम सोमनाथ मंदिराचं दर्शन घेणं पसंत केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, सोमनाथ मंदिरानंतर राहुल गांधी आज दुपारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशीही संवाद साधणार आहेत. कालच राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक घेऊन मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय त्यामुळे आजच्या गुजरात दौऱ्यात राहुल गांधी पक्षांच्या आमदारांना काय संदेश देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 11:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading