S M L

आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

आज दिवसभरात घडणाऱ्या या 5 महत्त्वाच्या बातम्यांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Updated On: Mar 12, 2019 06:28 AM IST

आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

सुजय विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा मंगळवारी भाजप प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत 12 मार्चला दादरमधील वसंत स्मृती सभागृहात त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

संजय काकडेंना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता


भाजपचे पुण्याचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. 'भाजपमधील कामकाजावर आपण नाराज आहोत. याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे ठरलेलं आहे', असं संजय काकडे यांनी जाहीर केलं आहे. तसंच 'भाजपने आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप सोडतोय असं काहीही नाही. 2020 पर्यंत मी राज्यसभेवर आहे. मी फक्त स्थानिक कामकाजावर नाराज आहे, प्रदेशाध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज आहे म्हणून हा निर्णय घेतला' असंही काकडेंनी स्पष्ट केलं.

युती झाली तर कोकणात शिवसेना - भाजपमध्ये धुसपूस

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली असली तरी तळ कोकणात मात्र भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसपूस सुरू आहे. कारण शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोकणातकाय राजकीय चित्र रंगतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Loading...

बहुजन वंचित आघाडी पत्रकार परिषद

सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. आंबेडकर स्वत: सोलापूरमधून निवडणुका लढणार असल्याने सोलापूरात काँग्रेसची डोकेदुखी वाढली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी 2.30 वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बहुजन वंचित आघाडी काय भूमिका मांडणार याकडे आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष असणार आहे.

मातोश्रीला लोकसभा निवडणुकांसंदर्भात बैठक

काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकींवर बैठका सुरू आहेत. त्यात आता शिवसेनेची मंगळवारी मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभांच्या जागांसाठी शिवसेना या बैठकीत काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2019 06:28 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close