आज सोनम कपूर आनंद अाहुजाचं शुभमंगल! असा असेल विवाह सोहळा

आज सोनम कपूर आनंद अाहुजाचं शुभमंगल! असा असेल विवाह सोहळा

होणार होणार म्हणता म्हणता सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची लग्नघटीका अगदीच समीप आली आहे. आज शिख पद्धतीने गुरूद्वाऱ्यात ते विवाहबद्ध होणार आहेत.

  • Share this:

विराज मुळे, 08 मे : होणार होणार म्हणता म्हणता सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची लग्नघटीका अगदीच समीप आली आहे. आज शिख पद्धतीने गुरूद्वाऱ्यात ते विवाहबद्ध होणार आहेत. ज्या क्षणाची संपूर्ण बॉलिवूड वाट पाहतंय ते सोनम दी वेडिंग आज पार पडतेय.

ती रूपाची राणी आणि तो सुंदर राजकुमार. सोनम कपूर आणि आनंद आहुजा आज अखेर एकमेकांचे जनम जनम के साथी बनणारे आहेत. काल संगीत सेरिमनी पार पडल्यानंतर आज सोनमचा विवाहसोहळा पार पडतोय. या सोनम दी वेडिंगची त्यांच्या कुटुंबीयांएवढीच बॉलिवूडकरांना आणि तिच्या करोडो फॅन्सनाही उत्सुकता आहे. सोनमच्या विनंतीवरूनच हे लग्न मुंबईत होतंय.

आनंदचे कुटुंबिय आणि मित्र मैत्रीणी हे सध्या वांद्र्याच्या सोफिटेल हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. इथूनच सकाळी साडेनऊच्या सुमारास नवरदेवाची वरात निघेल.

त्यानंतर सकाळी 11 वाजता वांद्र्यातील गुरूद्वाऱ्यात अनंत कारज आणि विवाहाची विधी पार पडणार आहे. त्यानंतर वांद्रे बँण्डस्टँडवरील रॉकडेल बंगल्यात कुटुंबीयांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र हा कार्यक्रम कुटुंबापुरताच मर्यादित असेल.

संध्याकाळी 8 नंतर मात्र मुंबईतल्या 'द लीला' या पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नाची रिसेप्शन सेरिमनी पार पडणार आहे. यासाठी बॉलिवूडमधील दिग्गजांसह, सोनमचे मित्र आणि ज्यांच्यासोबत तीने काम केलंय अशा व्यक्तींना आवर्जून निमंत्रण पाठवण्यात आलंय. याशिवाय सोनमचे ज्यांच्याशी मतभेद झाले अशा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही या कार्यक्रमाचं खास आमंत्रण आहे. त्यामुळे हे या सोहळ्याला ते येणार अथवा नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.

थोडक्यात काय तर बॉलिवूडची ही मुंबईकर मसक्कली गर्ल आता दिल्लीची सून बनण्यासाठी सज्ज झालीय. मुंबईत लग्न आणि रिसेप्शन पार पडल्यावर दिल्लीतही एक रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. लग्न सोहळ्याची सारी तयारी पूर्ण झालीय. आता वाट पहायचीय ती बॉलिवूडच्या सिनेमात दाखवतात तसाच 'अँण्ड दे लीव्ह हॅपिली एव्हर आफ्टर'चा क्षण या दोघांच्या आयुष्यात येण्याची.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2018 09:05 AM IST

ताज्या बातम्या