24 डिसेंबर : विक्रमी द्विशतकवीर रोहित शर्मा आपल्या नेतृत्वात यजमान टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध मालिकेत विजयाची हॅट्ट्रिक मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या नेतृत्वात टीमने मालिकेतील टी-२० सामन्यात सलग दोन विजय पटकावलाय. आता तिसरा सामन्यातील विजयासाठी यजमान टीम उत्सुक आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना आज मुंबईच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात बाजी मारल्यास भारताच्या नावे विजयाची हॅट्ट्रिक नोंद होईल. तसंच भारताला दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या श्रीलंकेचा मालिकेत ३-० ने सुफडासाफ करता येईल.
दुसरीकडे सलगच्या लाजिरवाण्या पराभवाने श्रीलंकन टीमला दौऱ्यात तिन्ही मालिका गमवाव्या लागल्या. आता सत्रातील आणि दौऱ्यातील शेवट गोड करण्यासाठी श्रीलंकेचे खेळाडू प्रयत्नशील राहतील. परेराच्या नेतृत्वाखाली या टीमला मालिकेत सलग दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आता तिसऱ्या सामन्यातून विजयी ट्रॅकवर येण्याचा कर्णधार परेराचा मानस आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा