रविवारी मध्ये रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कल्याण येथील 100 वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी रेल्वेसेवा बंद असणार आहे. सुमारे 6 तास ब्लॉक घेण्यात आलेला आहे. सविस्तर वाचा...
मुंबईत उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांनी अखेर 15 व्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता तोडगा निघाला आहे. मराठा आंदोलकांच्या मागण्या येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी आंदोलकांना दिलं. दरम्यान येत्या 10 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. सविस्तर वाचा...
हिवाळी अधिवेशनाच्या पार्शभूमीवर आज कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आली आहे तर विरोधकांची दुपारी 12 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. सविस्तर वाचा...
ओला उबर चालकांचा पुन्हा संप. शनिवार मध्यरात्रीपासून चालक पुन्हा जाणार संपावर. सविस्तर वाचा...
साताऱ्यामध्ये विषारी औषध पिऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कर्जाला कंटाळून आयुष्य संपवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिटू मोहिमेत अनेक सेलेब्रिटी आणि राजकारणी वादात सापडले. आता तर ज्यांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे त्याच खाकीतील माणसाने सैतानी कृत्य केले आहे. एका महिला पोलीस काॅन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे. सविस्तर वाचा...
क्रिकेट विश्वचषक : भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, सविस्तर वाचा...