लागोपाठ सहाव्या दिवशी पेट्रोल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोलचे दर कमी झालेत. तर डिझेलचे भाव स्थिर राहिलेत. जाणून घ्या आजच्या किमती

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 11:08 AM IST

लागोपाठ सहाव्या दिवशी पेट्रोल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

मुंबई, 07 ऑगस्ट : आज लागोपाठ 6व्या दिवशी पेट्रोलची किंमत कमी झालीय. डिझेलच्या दरात चौथ्या दिवशीही काही बदल झालेले नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर कच्च्या तेलाची किंमत, अमेरिकन डाॅलरचा एक्स्चेंज दर, इंधनाची मागणी या गोष्टींचा परिणाम होत असतो. कच्च्या तेलाची किंमत वाढली की पेट्रोलचे दर वाढतात.

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोलची किंमत 72.28 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 65.94 रुपये आहे. कोलकत्ता आणि मुंबईत पेट्रोल 9 पैशांनी कमी झालंय. चेन्नईत पेट्रोल 10 पैशांनी कमी झालंय. तसंच कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर क्रमश: 74.97 रुपये, 77.93 रुपये आणि 75.09 रुपये प्रति लीटर आहेत. डिझेलचे दर जुनेच आहेत . ते क्रमश: 68.17 रुपये, 69.11 रुपये आणि 69.64 रुपये प्रति लीटर आहे.

RBI ची खास गिफ्ट! आता झीरो बॅलन्स असलेल्या खातेधारकांना मिळणार 'या' सुविधा

सकाळी 6 वाजता ठरतात दर

Loading...

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

तुम्हालाही मिळू शकते Netflix मध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवाराला मिळेल पसंती

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, रोज 22 रुपये खर्च करून मिळतील हे 4 फायदे

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

रायगड- मुरूड इथे दरड कोसळली, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2019 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...