आज दिवसभरातील या आहेत 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील या आहेत 5 महत्त्वाच्या बातम्या

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची जोरदार चर्चा सुरू आहे

  • Share this:

जालन्यात भाजप कार्यकारिणी बैठक


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीला सुरूवात होणार आहे. 2014 पेक्षा 2 अधिक जागा देऊन लोकसभेत शिवसेनेशी युती करण्याचा नवा फॉर्म्युला भाजपनं तयार केला, असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या नव्या फॉर्म्युलावर चर्चा होऊन त्या अनुशंगानं शिवसेना पक्षप्रमुखांशी संपर्क साधला जाऊ शकतो.


मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.


राजू शेट्टी यांचं पुण्यात आंदोलन


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उसाच्या एफआरपी संदर्भात पुण्यात आंदोलन करणार आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात स्वाभिमानी कार्यकर्ते जमणार आहे.


राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा


राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज कोल्हापूर जिल्ह्यात पार पडणार आहे. सकाळी कागल इथं शरद पवार यांची सभा पार पडणार आहे.


राहुल गांधी रायपूर दौऱ्यावर


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी रायपूर दौऱ्यावर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

==========================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2019 07:01 AM IST

ताज्या बातम्या