राणे- केसरकर आमनेसामने
एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणारे स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे आणि राज्यमंत्री दीपक केसरकर आमने सामने येणार आहे. जिल्हा नियोजन बैठकीत नारायण राणे आणि दीपक केसरकर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.
शबरीमाला प्रकरणावर सुनावणी
केरळमध्ये शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशा देण्याच्या मुद्दावर वाद सुरूच आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्णयात महिलांना मंदिरात प्रवेश द्या असं स्पष्ट म्हटलं होतं. त्यानंतर याच मुद्यावरून पुर्नविचार करण्यासाठी तब्बल 48 पुर्नविचारयाचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
महेश एलकुंचवार नाट्य संमेलनाध्यक्ष?
नागपुरात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
उद्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत औपचारिक घोषणा होणार आहे.
जळगावात राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 18 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने चाळीसगाव, पारोळा आणि जळगाव शहरातील मणियार मैदानावर सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित राहणार आहे
रेल्वेमंत्र्यांची पत्रकार परिषद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दादर इथं भाजप कार्यलयात पत्रकार परिषद होणार आहे.