दिल्लीत आज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण

दिल्लीत आज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण

कासवला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बहुमान मिळालाय तर दशक्रियाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मान मिळालाय. तसंच व्हेंटिलेटर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलन म्हणून पुरस्कार मिळालाय.

  • Share this:

03 मे : 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडेल. राष्ट्रपतींच्या हस्ते कलेचा आणि कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. संध्याकाळी 6वाजता हा सोहळा संपन्न होईल.

या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांनी मानाचा तुरा रोवलाय. कासवला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बहुमान मिळालाय तर दशक्रियाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मान मिळालाय. तसंच व्हेंटिलेटर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलन म्हणून पुरस्कार मिळालाय.

अक्षय कुमारला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2017

सर्वोत्कृष्ट चित्रपट - कासव

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया

सर्वोत्कृष्ट संकलन - व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - नीरजा

सर्वोत्कृष्ट अभिनेता - अक्षय कुमार(रुस्तम)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कर(व्हेंटिलेटर)

विशेष उल्लेखनीय पुरस्कार - नीरजा (सोनम कपूर)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- शिवाय

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सायकल

सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट पटकथा - दशक्रिया

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- झायरा वासिम (दंगल)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मनोज जोशी (दशक्रिया)

सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट - पिंक

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 02:24 PM IST

ताज्या बातम्या