हवेतील ऑक्सिजनचा रुग्णांसाठी करणार वापर, आरोग्यमंत्री टोपेंचा नवा फंडा

हवेतील ऑक्सिजनचा रुग्णांसाठी करणार वापर, आरोग्यमंत्री टोपेंचा नवा फंडा

राज्यात एकीकडे रेमीडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे.

  • Share this:

जालना, 14 एप्रिल : राज्यात एकीकडे कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे मात्र ऑक्सिजन कमतरतेमुळे (oxygen cylinder) कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ही वाढत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी हवेतील ऑक्सिजनचा वापर करण्याचा पर्याय सुचवला आहे.

राज्यात एकीकडे रेमीडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यातील ऑक्सिजन साठा आता फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला असून त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना त्यावर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

CBSE Board Exams 2021: दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे

एवढंच नव्हे तर हवेतील ऑक्सिजनचे शुद्धीकरण करून त्याचा पोर्टेबल यंत्रांद्वारे कोरोना रुग्णांसाठी वापर करण्याची अनोखं तंत्रज्ञान वापरण्याचा सरकारचा मानस आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मतदारसंघ असलेल्या घनसावंगीत प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केला जाणार आहे.

कमी खर्चात, कमी वेळेत आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून ऑक्सिजन निर्मितीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मोठी बातमी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

हवेतील ऑक्सिजन घेऊन त्यावर प्रक्रिया करून ते साठवले जाणार आहे. हे ऑक्सिजनचे सिलेंडर रुग्णालयात देण्यात येणार आहे. एका कपाटाएवढे हे यंत्र आहे, जे इतर गावातून दुसऱ्या गावात सुद्धा ने आण करण्यास सोपे आहे, असंही टोपे यांनी सांगितले.

हा प्रयोग जर यशस्वी झाला तर महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.

Published by: sachin Salve
First published: April 14, 2021, 7:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या