पाकिस्तानची 'बनवाबनवी'; खोटा व्हिडिओ दाखवून भारतावर हल्ला केल्याचा दावा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 24, 2017 02:46 PM IST

पाकिस्तानची 'बनवाबनवी'; खोटा व्हिडिओ दाखवून भारतावर हल्ला केल्याचा दावा

24 मे : भारतीय सैन्यानं नौशेरामध्ये सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2 करुन पाकच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ काल जारी केल्यानंतर, पाकिस्तानननं एका बनावट व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. स्वत: च्याच उद्धवस्त झालेल्या चौक्यांची दृश्यं चित्रीत करुन भारतावर हल्ला केल्याचा कांगावा पाकिस्ताननं सुरू केला आहे.

पाकिस्तानी सैन्य दलाने काल रात्री उशीरा एका पत्रकार परिषदेत हा व्हिडीओ जारी केला. तसंच 13 मे रोजी पाकिस्ताननं भारतावर हल्ला करुन भारतीय सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

भारतीय जवानांनी 9 मे रोजी पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचा व्हिडीओ भारतीय सैन्य दलाने काल जारी केला. या व्हिडीओत घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या भारताने काशाप्रकारे उद्ध्वस्त केल्या, हे संपूर्ण जगाने पाहिलं.  या कारवाईसाठी लष्करानं रॉकेट लाँचर्स, अँटी टँक गाइडेड मिसाईल्स, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर्सचा वापर केला. पण यावर पाकिस्तान आता स्वत:च्याच उद्ध्वस्त चौक्यांचा व्हिडीओ दाखवून भारतावर हल्ला केल्याचा दावा करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2017 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close