News18 Lokmat

'त्या' व्हायरल क्लिपमुळे ठाणे आयुक्त संजीव जैस्वाल व्यथित, शासनाकडे मागितली बदली !

ठाण्यात गेले तीन वर्षे विकासकामांचा धडाका लावणारे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वतःच बदलीसाठी राज्य शासनाला विनंती केली केलीय. गेले काही दिवस आयुक्तांच्या विरोधात व्हायरल झालेल्या क्लिपमुळे ते व्यथित झालेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2017 06:40 PM IST

'त्या' व्हायरल क्लिपमुळे ठाणे आयुक्त संजीव जैस्वाल व्यथित, शासनाकडे मागितली बदली !

22 डिसेंबर, ठाणे : शहरात गेले तीन वर्षे विकासकामांचा धडाका लावणारे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वतःच बदलीसाठी राज्य शासनाला विनंती केली केलीय. शुक्रवारच्या पालिका सर्वसाधारण सभेतच खुद्द आयुक्तांनीच यासंबंधीची माहिती दिली. गेले काही दिवस आयुक्तांच्या विरोधात व्हायरल झालेल्या क्लिपमुळे ते व्यथित झालेत. किंबहुना आज सभागृहातही त्यांनी अतिशय भावनिक विचार व्यक्त केले.

आयुक्त संजीव जैस्वाल म्हणाले, ''मी गेले तीन वर्ष शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून आता ठाणेकरांमध्ये माझे 'रिपोर्टकार्ड' तयार झालंय. खरंतर प्रशासकीय प्रमुख म्हणून मी कायद्याच्या चौकटीच राहून निर्णय घेतले. मात्र, काही लोकांनी वैयक्तिक स्वरूपाची टीका केल्याने या गोष्टींची आपल्याला खंत वाटतेय.''

संजीव जैस्वाल यांनी ठाणे शहरात गेल्या तीन वर्षात विकासकामांचा धडा लावत अनेक कठोर निर्णय घेतले. त्यातूनच काही लोक दुखावले आणि त्यांनी आयुक्तांच्या बदनामीची मोहिमच सोशल मीडियातून हाती घेतली. मध्यंतरी त्यांची व्हायरल झालेली 'ती' क्लिप ही त्याचाच एक प्रकार होता. म्हणूनच आयुक्तांनी स्वतःहून बदलीसाठी शासनाकडे अर्ज केल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...