मुंबई, 4 मे- काही दिवसांपासून 'डायन' मालिकेतील लीडिंग स्टार्समधील भांडण थांबण्याचं नाव घेत नाहीये. मालिकेची आघाडीची अभिनेत्री टीना दत्ताने तिचा सहकलाकार मोहित मल्होत्रावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप केला होता. डायन सिनेमात दोघं पती- पत्नीची व्यक्तिरेखा साकारत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, टीनाने सर्वांसमोर मोहितला फटकारलं होतं. टिनाने मोहितवर सीनच्यावेळी गरजेपेक्षा जास्त क्लोज येण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप केला होता. आता याच्याशी संबंधीत अजून एक गोष्ट समोर आली आहे.
‘आता सगळं लीगल आहे’, म्हणत या अभिनेत्रीने केलं दुसऱ्या अभिनेत्रीला प्रपोज
आता दोघांनी झालं गेलं विसरून एकमेकांसोबत सामान्य वागण्याचा निर्णय घेतला तसेच भूतकाळ विसरून नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय टिना आणि मोहितने घेतला असे रिपोर्ट समोर आले होते. पण वास्तवात असे काही नाही. दोघं एकमेकांशी बोलणंही टाळतात.
हनीमूनला पॅरिसला जातो सांगून शाहरुख या ठिकाणी घेऊन गौरीला, स्वतः केला खुलासा
एका एण्टरटेनमेन्ट पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, टिना आणि मोहितच्या सांगण्यावरून दिग्दर्शक अक्शन बोलण्याच्याआधी आणि कट बोलण्यानंतर कोणत्याही पद्धतीने एकमेकांशी बोलत नाहीत. जेव्हा दिग्दर्शक त्यांना सीन समजवतात तेव्हाही दोघं एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संभाषण करत नाहीत. दोघं उत्कृष्ट कलाकार असल्यामुळे सीनमध्ये त्यांच्यातील मतभेद दिसून येत नाहीत.
‘मला माहीत होतं की ती मुलगी योग्य नाही,’ जेव्हा रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलल्या नीतू कपूर
टिना आणि मोहित 'डायन' मालिकेत जान्हवी आणि आकाश ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. असं म्हटलं जातं की, मोहितच्या अशा वागणुकीमुळे टिना फार त्रासली होती. एक दिवस सेटवर ती सर्वांसमोर रडायला लागली. यानंतर मोहितवर तिने अनेक गंभीर आरोप केले. टिना ही टीव्ही जगतातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'उतरन' मालिकेत इच्छाची व्यक्तिरेखा साकारली होती.
दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या 'त्या' सीनची चर्चा
VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स