S M L

बॉम्बस्फोट हल्ल्याने टाईम्स स्क्वेअर परिसर हादरला, 1 ठार 22 जखमी

अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर परिसरात आत्मघातकी बॉम्बहल्ला झालाय. त्यात 22 लोक जखमी झालेत. या बॉम्बस्फोटात एक जखमी मरण पावल्याचीही माहिती समोर येतेय

Chandrakant Funde | Updated On: Dec 11, 2017 07:45 PM IST

बॉम्बस्फोट हल्ल्याने टाईम्स स्क्वेअर परिसर हादरला, 1 ठार 22 जखमी

11 डिसेंबर, मॅनहॅटन : अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर परिसरात आत्मघातकी बॉम्बहल्ला झालाय. त्यात 22 लोक जखमी झालेत. या बॉम्बस्फोटात एक जखमी मरण पावल्याचीही माहिती समोर येतेय. मैनहैटन शहरातील एक बसस्थानकात हा स्फोट झालाय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे पाईप बॉम्बशदृश्य डिवाईस आढळून आलंय.

या स्फोटानंतर शहरात घबराटीचं वातावरण पसरलंय. या हल्ल्यानंतर शहरात हायअलर्टचे आदेश जारी करण्यात आलेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही. यापूर्वी न्यूयार्कमध्येही अशाच बॉम्बहल्ला झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 07:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close