TikTok व्हिलनची आत्महत्या, भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना मारून स्वत:ला झाडल्या गोळ्या!

TikTok व्हिलनची आत्महत्या, भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना मारून स्वत:ला झाडल्या गोळ्या!

अश्विनी कुमार (30) हा एका खून प्रकरणातील प्रमुख संशयित होता आणि त्याला मादक पदार्थांचे व्यसन होतं. तो स्वतःला 'खलनायक' म्हणवून टिकटॉवर व्हिडिओ पोस्ट करायचा.

  • Share this:

बिजनौर (उत्तर प्रदेश), 18 ऑक्टोबर : टिकटॉक (TikTok)चा खलनायक जॉनी दादा या नावाने प्रसिद्ध असलेल्या अश्विनी कुमार याने स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. टिकटॉकवर कायम विलनच्या भूमिकेत अश्विनी व्हिडिओ शूट करायचा. याच जॉनी दादाने शनिवारी उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील बहापूर भागात रोडवेज बसमध्ये स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी कुमार (30) हा एका खून प्रकरणातील प्रमुख संशयित होता आणि त्याला मादक पदार्थांचे व्यसन होतं. तो स्वतःला 'खलनायक' म्हणवून टिकटॉवर व्हिडिओ पोस्ट करायचा.

'मैं सब कुछ बर्बाद कर दूंगा', 'दानव अब तैयार है' और 'मेरा कहर देखो' अशा अनेक हिंसक फेसबुक पोस्टही त्याने शेअर केल्या होत्या. 27 सप्टेंबर रोजी अश्विनीने स्थानिक भाजपा नेत्याच्या 25 वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या पुतण्याला गोळी घालून ठार मारलं. या सगळ्या गुन्ह्यांनंतर त्याला बिजनौरमध्ये 'मोस्ट वॉन्टेड'च्या यादीत त्याचं नाव आलं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्याने एका मुलीची हत्या केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अश्विनीने एका मुलीलाही गोळ्या घालून ठार केलं होतं. गेल्या आठवड्यापासून 15 पोलिसांचं पथक त्याचा पाठलाग करत होतं. शुक्रवारी बिजनौरच्या नगीना भागात त्याचं लोकशन पोलिसांना सापडलं. बिजनौर पोलिस अधीक्षक विश्वजित श्रीवास्तव म्हणाले की, "तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि दिल्लीकडे जाणाऱ्या रोडवेज बसमध्ये चढला. शनिवारी रात्री 1.15 च्या सुमारास पोलिसांच्या स्थानिक पथकाने बसला पकडलं. "

इतर बातम्या - काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या

बसमधील दोन हवालदारांना गर्दीत तोंडावर पांढरा रुमाल घालून बसलेल्या प्रवाशावर संशय आला. तेव्हा ते त्याच्याकडे गेले. यावर अश्विनी घाबरला  आणि त्याने थेट बसमध्ये बंदूक काढून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी हा सिनेमातील 'व्हिलन' भूमिकांशी फार प्रेरित होता. त्याच्याकडून पोलिसांनी 14 पानांचं एक पत्र, एक पिस्तूल आणि दोन मासिकं जप्त केली आहेत. तर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

इतर बातम्या - आजचा वार ठरणार राजकीय, या दिग्गजांच्या प्रचार सभा विधानसभेचा निकाल बदलणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 07:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading