#JCBKiKhudai: तरुणाने JCBला नागिणीसारखं नाचवलं, TikTokवर व्हिडिओ व्हायरल

#JCBKiKhudai: तरुणाने JCBला नागिणीसारखं नाचवलं, TikTokवर व्हिडिओ व्हायरल

या TikTok व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा ती JCBला आपल्या तालावर नाचवत आहे. बरं इतकंच नाही तर प्रसिद्ध नागिन हे गाणंदेखील या व्हिडिओमध्ये प्ले करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर #JCBKiKhudai चे अनेक मीम्स व्हायरल होत होते. आता पुन्हा एकदा या हॅशगॅटचा वापर करत TikTokवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्या आहेत. त्यातला असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड शेअर करण्यात आला आहे.

या TikTok व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा ती JCBला आपल्या तालावर नाचवत आहे. बरं इतकंच नाही तर प्रसिद्ध नागिन हे गाणंदेखील या व्हिडिओमध्ये प्ले करण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये युवक पुंगी वाजवायला सुरुवात करतो आणि त्याच्या तालावर JCB डुलू लागतो.

या व्हिडिओला ट्विटरवर कृष्णा भट्टॉ नावाच्या एका महिलेने शेअर केलं आहे. या व्हिडिओला अनेक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. दरम्यान, TikTok वर अशा प्रकारच्या विनोदी व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. TikTok हा अॅप सध्या लोकांच्या आवडीचा विषय झाला आहे.

VIDEO: एवढी गोंडस परी कुणाला 'नकुशी' झाली?

First published: July 13, 2019, 1:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading