TikTok वर लागला 40.39 कोटींचा दंड, या यूजर्सचे व्हिडिओ होणार डिलीट

TikTok वर लागला 40.39 कोटींचा दंड, या यूजर्सचे व्हिडिओ होणार डिलीट

फेडरल ट्रेड कमिशनने देलेल्या माहितीनुसार, आता टिकटॉक 13 वर्षांखालील सर्व मुलांचे व्हिडिओ हटवेल.

  • Share this:

अमेरिका, 05 मार्च : चीनच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप 'TikTok'वर अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने बुधवारी 5.7 मिलियन म्हणजे 40.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची नावं, फोटो, ई-मेल आयडी, लोकेशन आणि फोटो बेकायदेशीररित्या घेतल्याचा आरोप 'TikTok'वर लगावण्यात आला आहे.

यावर उत्तर देताना TikTok ने स्पष्ट केलं की, यावर तात्काळ सुरक्षित पाऊल उचलण्यात येईल. अमेरिकेकडून ठोठावण्यात आलेला हा दंड 'musically' या अॅपलादेखील लागू करण्यात आला आहे. कारण 2017मध्ये musically ने बाईटडान्स नावाचं अॅप लॉन्च केलं होतं. नंतर 2018 मध्ये त्यांनी टिकटॉक शी भागेदारी केली होती.

फेडरल ट्रेड कमिशनने देलेल्या माहितीनुसार, आता टिकटॉक 13 वर्षांखालील सर्व मुलांचे व्हिडिओ हटवेल. तर यावर टिकटॉकचं  म्हणणं आहे की, सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी अमेरिकेमध्ये "यू आर इन कंट्रोल" नावाचं एक व्हिडिओ ट्यूटोरियल सुरू केलं आहे. जे यूएस आणि यूकेमध्ये वापरलं जातं.

अॅपने असेही म्हटले आहे की, जर भारतीय यूजर्स ते डाउनलोड करतील तर त्यासाठी कंपनीने 12 पेक्षा जास्त अॅप्समध्ये स्टोअर रेटिंग केली आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालक स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेतील.

सध्या भारतात व्हिडिओ शेअरिंग आणि लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिमगचा वापर करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. जगात सध्या 50 दशलक्षहून अधिक यूजर्स आहेत, ज्यापैकी 40 टक्के यूजर्स भारतीय आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे गुगलचा असा नियम आहे असे अॅप्स 13 वर्षांखालील मुलांनी वापरू नयेत.

या सगळ्यामुळे टिकटॉकचे व्हिडिओ पाहणाऱ्यांना आता त्यांची सुरक्षा पाहावी लागणार आहे. आपली मुलं या व्हिडिओच्या आहेरी तर जात नाहीत ना याची काळजी घ्या. सध्या गुगलवर असे अनेक अॅप आहेत ज्यातून आपली गुप्त माहितीदेखील लिक होत आहे. त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे आपण कोणती माहिती कुठे आणि कशी शेअर करतो याचं भान नेटकऱ्यांनी ठेवणं महत्त्वाचं आहे.

मनोरंजनासाठी वारण्यात येणारे हे अॅप सध्या तरुणाईच्या आयुष्याचा भाग झाले आहेत. त्यातून कुठेतरी आपली कर्तव्यनिष्ठता कमी झाली असं म्हणायला हरकत नाही. आताची तरुणाई अशा अॅपवर व्हिडिओ तयार करते आणि प्रसिद्धी मिळवते. त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो. पण यातूनच गुन्हेगारीला वाट मिळतेय हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे अशा अॅप्सवर चपराक बसणं तितकंच महत्त्वाचं आहे.

VIDEO : अन् खळ्ळ-खट्याॅक, मनसे रणरागिणींनी लंपट व्यवस्थापकाला धु-धु धुतले

First published: March 5, 2019, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading