मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Tiktok स्टार सिया कक्करच्या खोलीत सापडला मोठा पुरावा, समोर आलं आत्महत्येचं धक्कादायक कारण

Tiktok स्टार सिया कक्करच्या खोलीत सापडला मोठा पुरावा, समोर आलं आत्महत्येचं धक्कादायक कारण

16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्करनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्करनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्करनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मुंबई, 26 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूतनंतर 16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्कर टोकाचं पाऊल उचलत बुधवारी आयुष्य संपवलं. सियाच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वास खळबळ उडाली. पोलिसांना सियाच्या खोलीतून काही महत्त्वपूर्ण कामगदपत्र, लॅपटॉप, कादगपत्र ताब्यात घेतली आहेत. तर सियाचं पार्थिव शवविच्छेदन अहवालानंतर कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सियाला काही दिवसांपासून सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या धमक्यांमुळे सियानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हे वाचा-20 तासापूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता VIDEO,टिकटॉकरच्या आत्महत्येमुळे खळबळ

सियानं अगदी कमी वयात 16 वर्षी सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळवली होती. टिकटॉकवर लाखो तर इन्स्टाग्रामवर 98 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे काही फॅनपेज देखील बनवण्यात आले आहेत.सियानं आत्महत्या केल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 9.30 वाजता गीता कॉलनीमधील एका रुग्णालयातून सियाच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळाली. डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सियानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सियाच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र सियाच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिला धमक्या आल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Entertenment, Instagram, Instagram video, Tik tok