Home /News /news /

डाऊनलोडच्या बाबतीत TikTok ने Facebook ला टाकलं मागे; महिन्याला 4 अब्ज डॉलरची कमाई

डाऊनलोडच्या बाबतीत TikTok ने Facebook ला टाकलं मागे; महिन्याला 4 अब्ज डॉलरची कमाई

2019 साली भारतात TikTok  सर्वाधिक डाऊनलोड झालेलं अ‍ॅप आहे. 

    नवी दिल्ली, 29 जून : भारतात 59 चायनीज मोबाईल अ‍ॅपवर (Chinese mobile app) बंदी घालायचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला. ज्यामध्ये टिकटॉकचाही (TikTok) समावेश आहे. या अ‍ॅपची महिन्याला 40 दशलक्ष डॉलर्सची कमाई आहे. डाऊनलोडच्या बाबतीतही हे अ‍ॅप अव्वल स्थानावर आहे. अशा अ‍ॅपवर आता भारतात बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे टिकटॉकच्या कमाईलाही धक्का बसणार आहे. 2019 साली सेंसर टॉवरच्या रिपोर्टनुसार, टिकटॉकच्या कमाईतही 540 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. फक्त डिसेंबरमध्येच टिकटॉकने 40 अब्ज डॉलर कमवलेत. कमाईच्या बाबतीत हा अ‍ॅप डिसेंबर 2019 मध्ये सातव्या क्रमांकावर होता.  टिकटॉकची सर्वाधिक कमाई चीन आणि त्यानंतर अमेरिकेतून होते. 2019 च्या चौथ्या तिमाहीत 78 टक्के फायदा चीन आणि 16 टक्के यूएसमधून झाला आहे. हे वाचा - मोठी बातमी : TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर मोदी सरकारची बंदी सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅपमध्ये टिकटॉक दुसऱ्या स्थानावर आहे. व्हॉट्सअ‍ॅपनंतर डाऊनलोड केलं जाणारं हे दुसरं अ‍ॅप आहे. तर फेसबुक आणि मेसेंजर हे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.  डाऊनलोडच्या बाबतीत टिकटॉकने फेसबुकलाही मागे टाकलं आहे. टिकटॉकने 700 दशलक्षपेक्षा जास्त डाऊनलोड पूर्ण केलेत. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंतची ही आकडेवारी आहे.   यात जवळपास 45 टक्के भारताचा सहभाग आहे.  2019 साली हे अ‍ॅप भारतात सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात आलं आहे.  त्यानंतर ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. तर यूएसमध्ये हा अ‍ॅप डाऊनलोड करण्याचं प्रमाण 83 टक्क्यांनी वाढलं. हे वाचा -  या 5 कारणांमुळे घातली मोदी सरकारने घातली चिनी Apps वर बंदी भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने टिकटॉकसह 59 चायनीज मोबाईल अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.  देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अ‍ॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Tiktok

    पुढील बातम्या