'bae time' असं या फोटोला तिनी कॅप्शन दिलं असून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कृष्णा ही सोशल मीडियावर(social media) मोठ्या प्रमाणात अक्टिव्ह असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर टाकत असते. काही दिवसांपूर्वी नुसरतनी टायगरबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याने टायगरला 'भाऊ' देखील म्हटलं होतं. कृष्णा श्रॉफने हा फोटो शेअर केल्यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड एबन हायम्स याने कमेंट केलेली आहे. हे वाचा-Viral Alert : ईशा गुप्ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ खूप लवकर बदललीस या फोटोवर एबन हायम्सने कमेंट करत ‘तू तर इतक्या लवकर पुढे निघून गेलीस’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने या कमेंटबरोबर हसण्याचे इमोजी देखील टाकले आहेत. एबन हा व्यावसायिक बास्केटबॉल प्लेअर असून काही महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं होतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiger Shroff