माओवाद्यांच्या या दोन पत्रांनी झाला मोदी आणि शहांच्या हत्येच्या कटाचा खुलासा

माओवाद्यांच्या या दोन पत्रांनी झाला मोदी आणि शहांच्या हत्येच्या कटाचा खुलासा

माओवाद्यांच्या पत्रांमधून मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघडकीस आला. त्याचबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंगयांच्या हत्याचाही कटाचाही उल्लेख एका पत्रात आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे

 • Share this:

पुणे,ता. 29 ऑगस्ट : पुणे पोलिसांनी ज्या पाच माओवादी समर्थक नेत्यांना अटक केली त्यांच्याकडून दोन पत्र जप्त करण्यात आली होती. त्या पत्रांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघडकीस आला. त्याचबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंगयांच्या हत्याचाही कटाचाही उल्लेख एका पत्रात आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. 2016 मध्ये माओवाद्यांनी पाठवलेल्या पत्रांमध्ये मोदी, शहा आणि सिंग यांच्या हत्या कटाची चर्चा आढळून आली. तर 2017 मधल्या एका पत्रात राजीव गांधींची हत्या ज्या प्रकारे बॉम्ब स्फोटाव्दारे करण्यात आली होती त्याच प्रकारे पंतप्रधान मोदींचीही हत्या घडवून आणता येवू शकते का याची चाचपणी माओवादी करत होते असा दावा पोलीसांनी केला आहे. दुसरं पत्र हे कॉम्रेड प्रकाश यांच्या नावावर असून ते पत्र रोना विल्सन यांच्या दिल्लीतल्या घरातून जप्त करण्यात आलं होतं. या धक्कादायक माहितीनंतर पोलिसांनी देशभर छापे घालून पाच माओादी समर्थकांना अटक केली होती. आज पुणे कोर्टात काही समर्थकांना पोलिसांनी हजर केलं आणि अत्यंत गंभीर पुरावे सादर केले.

हे आहे माओवाद्यांचं कारस्थान

 • अटक केलेले सर्व जण हे माओवाद्यांचे 'थिंक टँक'. शहरी भागात माओवादी विचार पेरणं हे या 'थिंक टँक'चं काम.

 • 'थिंक टँक'ने धोरणं तयार करायची आणि दुसऱ्या फळीने ती अमंलात आणायची अशी योजना. पुण्यातली एल्गार परिषद ही त्याच योजनेचा भाग.

 • विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करून ते प्रोफेशनल क्रांतिकारी बनतील याची तयारी. विविध परिषदांमधून एवढे टोकाचे विचार मांडायचे की दंगलीला पोषक वातावरण निर्माण होईल.

 • नरेंद्र मोदी सरकारने विरोधी चळवळींना दडपून टाकण्याचं काम सुरू केलंय. माओवाद्यांची क्रांती अयशस्वी करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हंट 3 सुरू केलंय.

 • देशात अँटी फॅसिस्ट फ्रंट तयार करण्याचा प्रयत्न करण्याचा माओवाद्यांचा कट

 • भाकप माओवादी ही क्रांती करणारी एकमेव पार्टी आहे. त्यामुळे क्रांतीची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल.

 • गडचिरोलीच्या खोट्या एन्काऊंटरचा अभ्यास करण्यासाठी सत्य शोधन समिती बनवा आणि विद्यार्थ्यांना जोडून घ्या.

 • अरुण परेरा हा अनेक विद्यार्थी चळवळीत आपली विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न करतोय ,विद्यार्थ्यांना चळवळीत घ्या त्यांना जंगलात पाठवून ट्रेनिंग द्या

 • मुंबई पुणे आणि आणखी शहरांमध्ये राजकीय खुनाचं (रोहित वेमुला प्रकरणासारखं) भांडवल करा.

 • या सगळ्यात वरवरा राव यांनी भूमिका फार मोठी. शस्त्रांच्या खरेदीचे सगळे अधिकार त्यांच्याकडे होते यावरून त्यांचा सहभाग स्पष्ट होतो

 • माओवाद्यांचा सर्वोच्च नेता कॉम्रेड गणपती याने वर्णन गोंसलविस याच्या भेटीसाठी वेळ मागितलीय. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि कोकण भागात काही समर्थक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न.

 • सुरेंद्र गडलिंग यांनी प्रकाश याना लिहिलेलं आणखी एक पत्र. वरवरा राव यांच्याकडून फंड आलाय ,आपण फॅक्ट फाईंडिंग कमिटी साठी ही फंड गोळा करतोय. पुढच्या कारवाई साठी जंगलातले कॉम्रेड संपर्कात आहेत.

 • पत्रात शस्त्र आणि दारुगोळा विकत घेण्याचा गरजांबाबत विचारणा. नेपाळच्या अरुण आणि वर्णन चा उल्लेख 4 लाख राऊंड ची मागणी करताना आला आहे.

 • ते घेण्यासाठी नेपाळमध्ये संपर्क केलाय आणि फक्त वरवरा राव यांना फक्त खरेदीसाठीचे बोलायचे अधिकार आहे त्यासाठी मणिपूर चे कॉम्रेड मदत करताहेत.

 

 

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 09:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading