ओढ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

ओढ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

  • Share this:

नांदेड, 28 जुलै: कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. अशा फावल्या वेळेत पोहण्यासह इतर छंद विद्यार्थी जोपासताना दिसत आहेत. मात्र, ओढ्यात पोहोण्यासाठी जाणं 3 शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं आहे. 3 बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

हेही वाचा...कोरोनाची दहशत असताना कोकणात अज्ञात आजाराचं थैमान, गुहागरमध्ये 19 जणांचा मृत्यू

किनवट तालुक्यातील चिखली गावात ही घटना घडली आहे. रितेश देशाट्टीवाद (11), गंगाधर भांडारवाद (14) आणि श्रीकांत नागुवाद (14) अशी मृत मुलांची नावं आहेत.

मिळालेली माहिती अशी की, किनवट तालुक्यात येणाऱ्या चिखली येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. वेळ घालवण्यासाठी मुले पोहण्यासह इतर छंद विद्यार्थी जोपासत आहेत. सध्या किनवड भागात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले वाहू लागले आहेत. चिखली येथील ओढ्याला पाणी आलं आहे. शाळा नसल्याने गावातील रितेश, गंगाधर आणि श्रीकांत हे तिघं मित्र पोहण्यासाठी ओढ्यावर गेले होते. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेमुळे चिखली गावावर शोककळा पसरली आहे.

पोहण्यासाठी गेलेल्या 4 मित्रांपैकी तिघांना जलसमाधी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सुट्टीची मज्जा तीन मित्रांच्या जीवावर बेतली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या 4 मित्रापैकी तिघांचा धरणाच्या बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या वालदेवी धरणात शनिवारी ही घटना घडली आहे. योगेश बागुल, महेश लांडगे आणि वैभव पवार असं मृत तरुणांची नावं आहेत. सगळे नाशिक शहरातील नवीन नाशिक भागातील रहिवाशी होते.

मंगेश, महेश व वैभव हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. हे पाहून पाण्यात न उतरलेल्या गणेश याने स्थानिक नागरिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर पोहचलेल्या नागरिकांनी तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढलं. मात्र, तत्पूर्वीच तिघाही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

हेही वाचा...ट्रॉलीमध्ये माल लोड करताना तिसऱ्या मजल्यावरून कोसळला हेल्पर, समोर आला VIDEO

मंगेश बागूल हा मुंबई पोलिस कर्मचारी होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, बहीण, आई वडील आहेत. महेश लाळगे हा खासगी नोकरी करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक भाऊ,आई, वडील असा परिवार आहे. तर वैभव पवार इंजिनिअर असून तो एकूलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात बहीण, आई वडील असा परिवार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 28, 2020, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading