मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /5 कोटी डॉलरचं तिकीट घेऊन 3 प्रवासी करणार International Space Station ची सफर

5 कोटी डॉलरचं तिकीट घेऊन 3 प्रवासी करणार International Space Station ची सफर

आठ दिवसांची सफर 'नासा'ने (NASA) नव्हे, तर खासगी कंपनीने आयोजित केली आहे.

आठ दिवसांची सफर 'नासा'ने (NASA) नव्हे, तर खासगी कंपनीने आयोजित केली आहे.

आठ दिवसांची सफर 'नासा'ने (NASA) नव्हे, तर खासगी कंपनीने आयोजित केली आहे.

वॉशिंग्टन, 30 जानेवारी : अमेरिकेत सर्वसामान्य नागरिकांच्या अंतराळ प्रवासाची चर्चा बराच काळ होत राहिली आहे. ते प्रत्यक्षात कधी येईल, याचा विचार करता करता आता प्रत्यक्ष ती वेळ येऊन ठेपली आहे. अमेरिकेतल्या तीन व्यक्ती प्रत्येकी पाच कोटी डॉलरचं तिकीट घेऊन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची (International Space Station - ISS) आठ दिवसांची सफर करणार आहेत. ही सफर 'नासा'ने (NASA) नव्हे, तर खासगी कंपनीने आयोजित केली आहे. अॅक्सिअम कंपनीने (Axiom) स्पेसएक्सच्या (SpaceX) रॉकेटद्वारे ही सफर आयोजित केली आहे.

या अंतराळ सफरीत क्रू मेंबर्सव्यतिरिक्त इस्रायलचा एक फायटर पायलट, अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उद्योजक आणि कॅनडामधला एक गुंतवणूकदार अशा तीन व्यक्ती पर्यटक म्हणून प्रवास करणार आहेत. लॅरी कोनर हे अमेरिकेतले स्थावर मालमत्ता क्षेत्रातले गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले उद्योजक आहेत. ओहियो येथील तीन अब्ज उलाढाल असलेल्या कोनर ग्रुपचे ते प्रमुख आहेत. 70 वर्षांचे कोनर अंतराळात जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे वयोवृद्ध व्यक्ती आहेत.

मार्क पॅथी 50 वर्षांचे असून, ते मावरिक कॉर्पचे सीईओ आणि चेअरमन आहेत. मावरिक कार्प ही कॅनडाची एक खासगी गुंतवणूक आणि वित्तविषयक कंपनी आहे. माँट्रियलच्या स्टिंजरी ग्रुप नावाच्या म्युझिक कंपनीच्या बोर्डाचे चेअरमन आहेत. पॅथी फॅमिली फाउंडेशन आणि अन्य काही माध्यमांतून ते समाजसेवाही करतात. अंतराळात जाणारे ते कॅनडातले 11 वे नागरिक ठरतील.

हे ही वाचा-ऑनलाइन डेटिंग नको रे बाबा! भारतीयांना आहे ही भीती, Macfee चा अहवाल

ऐतान स्टीबी हे अंतराळात जाणारे दुसरे इस्रायली नागरिक ठरतील. व्हायटल कॅपिटल फंडचे ते संस्थापक असून, ते फायटर पायलटही होते. ते बेगुरियोन युनिव्हर्सिटीच्या 'सेंटर ऑफ आफ्रिकन स्टडीज'चे संस्थापक आणि विद्यमान सदस्य आहेत. त्याशिवाय शिक्षण, कला, संस्कृती या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक गैरसरकारी संस्थांच्या बोर्डामध्ये ते आहेत.

अंतराळात प्रवास करणारे इलान रोमन हे पहिले इस्रायली नागरिक होते. 2003मध्ये कोलंबिया अंतराळ यानात ते होते. ते यान अंतराळातून परतताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना नष्ट झालं होतं आणि त्यात यानातल्या सर्वांचा मृत्यू झाला होता. इलान रोमन हे स्टीबी यांचे जवळचे मित्र होते. आताच्या मोहिमेत मायकेल लोपेझ-अल्जिरिया हे मिशन कमांडरच्या (Mission Commander) भूमिकेत असतील. आतापर्यंत चार मोहिमांमध्ये त्यांचा समावेश होता आणि त्यातून ते 257 दिवस अंतराळात राहिले आहेत. त्यांना 10 दिवस स्पेसवॉकचाही अनुभव आहे. नासाच्या अॅस्ट्रॉनॉट कॉर्प्सचे ते वीस वर्षांहून अधिक काळ सदस्य आहेत. 2017मध्ये ते अॅक्सिअम कंपनीत आले आणि आता कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे उपाध्यक्ष आहेत.

हे ही वाचा-The White Tiger: जोनस कुटुंबानंतर हृतिक रोशननेही केलं प्रियांंका चोप्राचं कौतुक

अॅक्सिअम मिशन वन (AX1) ही मोहीम नासातर्फे एका व्यावसायिक कराराचा भाग म्हणून आयोजित केली जात आहे. यापूर्वीही सर्वसामान्य नागरिकांनी अंतराळ प्रवास केला आहे; मात्र खासगी अंतराळयानातून केली गेलेली ही पहिली अंतराळमोहीम असेल. यामध्ये स्पेसएक्सचं रॉकेट वापरलं जाईल, तसंच स्पेसएक्स ड्रॅगन टूचा उपयोग केला जाईल. रशिया 2001पासून आयएसएसची सफर घडवून आणत आहे. रशियाच्या, तसंच अमेरिकेच्या अंतराळवीरांसोबत अशा प्रवाशांनी रशिया सुयोज यानातून प्रवास केला आहे.

First published:

Tags: Nasa, Space