पानसरे हत्या प्रकरणी आणखी 3 मारेकऱ्यांना अटक, आरोपींची संख्या 12वर

सचिन अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई इथल्या आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतलं असून सकाळी 11 वाजता तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 10:10 AM IST

पानसरे हत्या प्रकरणी आणखी 3 मारेकऱ्यांना अटक, आरोपींची संख्या 12वर

कोल्हापूर, 06 सप्टेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यामध्ये आणखी तीन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे ईथून यांना अटक करण्यात आली. सचिन अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई इथल्या आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतलं असून सकाळी 11 वाजता तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंदुरे, बद्दी आणि मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे पानसरे हत्येमध्ये आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या 12 वर गेली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी त्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. शिवाय त्याच्याकडे हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती कोल्हापूर एसआयटीने कोर्टाला दिली होती.

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने तपास करत यापूर्वी आठ आरोपींची नावे समोर आणली होती. यातील सात आरोपींना यापूर्वीच अटक दाखवली असून विनय पोवार आणि वीरेंद्र तावडे हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी कोर्टासमोर अनेक पुरावे सादर केले होते.

कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळीबार झाला त्या घटनेच्या अगोदर पाच ते सहा दिवस जंभोटी, किणये (ता. बेळगाव ) इथे झालेले प्रशिक्षण आणि त्या रात्री बेळगाव एसटी स्टॅंडवर कॉम्रेड पानसरे हत्त्येच्या कटाची झालेली बैठक याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास करून त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेली अनोळखी तीन व्यक्तींबाबत त्यांच्याकडे तपास करणे गरजेचे आहे.

इतर बातम्या - भारत आज रात्री चंद्रावर रचणार इतिहास, वाचा 'Chandrayaan 2' चा महत्त्वाचा टप्पा

Loading...

या शिवाय शरद कळसकर याने बेळगाव तसेच कोल्हापूर येथे पिस्तूल तयार करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने तयार केलेल्या पिस्तूलचा वापर या गुन्ह्यात झाला आहे का याबाबत सुद्धा तपास करणे गरजेचे आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल घटनेपूर्वी कोणाकडे ठेवले होते. कोल्हापूरमध्ये कोणी आणि कोणाकडे आणून देणे याचा शोध घ्यायचा आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातनचे वकील संजीव पुनाळेकरला कोर्टानं 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींना शस्त्र लपविण्याच्या सूचना पुनाळेकरांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पुनाळेकरांकडून आणखी काही माहिती पाहिजे असल्यानं चौकशी करणं गरजेचं आहे असा युक्तिवाद सीबीआयने केला होता. तर सर्व माहिती दिली गेले असून चौकशीची गरज नाही असं पुनाळेकरांच्या वकिलांनी सांगितलं होतं. पण न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद ग्राह्य धरला.

इतर बातम्या - बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्यप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे या दोघांना 25 मे रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत.

SPECIAL REPORT : फास आवळला, दाऊदला भारतात कधी आणणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 10:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...