उरणच्या ONGC प्लांटमध्ये अग्नितांडव, CISFच्या फायर विंगचे 3 जवान शहीद

उरणच्या ONGC प्लांटमध्ये अग्नितांडव, CISFच्या फायर विंगचे 3 जवान शहीद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी ड्रनेज स्ट्रॉममध्ये गळती झाली. त्यानंतर CISF अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती देण्यात आली.

  • Share this:

नवी मुंबई, 03 सप्टेंबर : यगड जिल्ह्यातील उरण येथील ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन(ONGC )प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून या अग्नितांडवात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF (Central Industrial Security Force)च्या फायर विंगचे 3 जवान शहीद झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी ड्रनेज स्ट्रॉममध्ये गळती झाली. त्यानंतर CISF अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच CISFच्या फायर विंगचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचं काम सुरू होतं. पण त्याच वेळी मोठा स्फोट झाला. यामध्ये आगीचे मोठे लोट पसरले. CISFच्या फायर विंगचे जवान या आगीत सापडले आणि त्यातील 3 जवान जहीद झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एक जवान जखमी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही आग भडकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून युद्धपातळीवर आग आटोक्यात आणण्याचं कार्य सुरू आहे. रौद्ररुप धारण केलेल्या आगीमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान 10 हून अधिक जण कोल्ड स्टोअरेजमध्ये अडकल्याची भीतीदेखील वर्तवण्यात येत आहे.

आगीचे मोठ-मोठे लोट पसरत असल्यानं शेजारील परिसर रिकामा करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. आगीची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर ओएनजीसीच्या या प्रकल्पासून एक किलोमीटरपर्यंत नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, इंधन गळतीमुळे आग भडकल्याचं म्हटलं जात आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

VIDEO: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

Published by: Renuka Dhaybar
First published: September 3, 2019, 11:01 AM IST
Tags: fireongc

ताज्या बातम्या