Home /News /news /

राजस्थानात फिर फिर फिरले तीन मित्र; पैसे संपले म्हणून केला असा प्रताप, आता मागे पोलिसांचा ससेमीरा

राजस्थानात फिर फिर फिरले तीन मित्र; पैसे संपले म्हणून केला असा प्रताप, आता मागे पोलिसांचा ससेमीरा

तीनही मित्र सुट्टी काढून राजस्थानात फिरायला गेले होते. ते इतके फिरके की तिघांजवळील सर्व पैसे संपले. आता तिघांच्याही मागे पोलिसांचा ससेमीरा लागला आहे.

    जयपूर, 20 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) पाली भागात 4 डिसेंबर रोजी एका मागून एक सात दुकांनांमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली (Crime News) होती. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेर पोलिसांनी या चोरीत दोन आरोपींना अटक केली आहे. दोघे आरोपी बंगळुरूमधून राजस्थानात फिरायला आले होते. मात्र पर्यटनादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपले. मग काय या दोघा पठ्ठ्यांनी चोरी सुरू केली. यापैकी एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  ट्रान्सपोर्ट नगर SHO विक्रम साधूने सांगितलं की, या प्रकरणात जालोरमधील डबाल (सांचौर) निवासी 25 वर्षीय घसूपालसिंह राजपूत आणि आंध्रप्रदेश के बी-सी कॉलनी दीनेहटी अन्नतपूर निवासी 35 वर्षीय गोला रंगपा याला बंगळुरूत अटक करण्यात आली. आरोपी बंगळुरूमध्ये फुलांच्या डेकोरेशनचं काम करीत होते. संधी साधून फुलांची चोरी करून मार्केटमध्ये विकत होते. जालोर निवासी घसूपालसिंहच्या म्हणण्यानुसार, तीन मित्र राजस्थान येथे फिरायला आले होते. जयपुर, सवाई माधवपुर, जोधपुर आदी जिल्हे फिरत फिरत ते पालीतील ओम बन्नाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. येथून दर्शन करून ते पुन्हा पालीला परतले. 7 ते 8 दिवसांच्या टूरमध्ये या मित्रांकडील सर्व पैसे संपले. बंगळुरूला जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशात यांनी 4 डिसेंबरच्या रात्री नवा गाव रोड स्थित सात दुकांनात चोरी केली. हे ही वाचा-पुणे: दोन महिनेही टिकला नाही संसार, खून करुन पत्नीचा मृतदेह लटकवला पंख्याला CCTV फुटेजमुळे पकडले गेले चोर.. तिन्ही आरोपी नया गाव रोडवर नकबजनी येथे चोरी केल्यानंतर पायीच पाणीहारी येथे पोहोचले. येथे बसमध्ये बसून जोधपूरला गेले. येथून पुढे ट्रेन पकडून बंगळुरूला पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना बंगळुरूतून अटक केली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rajasthan

    पुढील बातम्या