लहानपणापासूनची मैत्री क्षणात संपली, ट्रक अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू

लहानपणापासूनची मैत्री क्षणात संपली, ट्रक अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू

हा भीषण अपघात शिरपूर महामार्गवरील कन्हाळा फाट्याजवळ घडला आहे. हे तिघेजण खास मित्र असून 20 ते 24 वयोगटातील आहेत.

  • Share this:

भुसावळ, 13 जानेवारी : भुसावळमध्ये तीन मित्रांनी एकाच वेळी आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत 3 तरुण मित्र जागीच ठार  झाले आहेत.

हा भीषण अपघात शिरपूर महामार्गवरील कन्हाळा फाट्याजवळ घडला आहे. हे तिघेजण खास मित्र असून 20 ते 24 वयोगटातील आहेत. सकाळी ते रस्त्यावरून जात असताना ट्रक चालकाने त्यांना मागून ठोकलं. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मयतांची नावं

- शेख वजीर शेख रफीक

- शेख समीर शेख हमीद

- शेख जावेद शेख मोहिनुद्दीन

या तिघांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. हे तिघेही जाममुल्ला काझी प्लॉट भुसावळमध्ये राहत होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकारात ट्रक चालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तर पोलीस सध्या यात आणखी तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून या तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर घरातील अशी तरुण मुलं गमावल्याने या तिघांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

VIDEO : इंडिया गेटवर महिलेचा गोंधळ, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

First published: January 13, 2019, 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading