पांडुरंगाचे दर्शन घेऊन मृत्यूला कवटाळले.. 24 तासांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात 24 तासांत 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 10:07 PM IST

पांडुरंगाचे दर्शन घेऊन मृत्यूला कवटाळले.. 24 तासांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड, 14 जुलै- शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात 24 तासांत 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

गेवराई तालुक्यातील मौजे सुशी येथील वयोवृद्ध 65 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. बाबासाहेब भांडवकर असं त्याचं नाव आहे तर दुसरी घटना बीड तालुक्यातील मैंदा येथील शेतकरी केशव दादाराव मोमीन यांनी सततच्या नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेत आत्महत्या केली. तिसरी घटना माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील 26 वर्षीय तरुण शेतकरी गणेश घुबडे याने घरातील सर्व झोपेत असतानाच आपली जीवनयात्रा संपवली आहे.यात मुख्य कारण हे नापिकी आणि कर्जबाजारी पणा हेच आहे.

मुलींच्या लग्नाला, हॉस्पिटलमधील खर्च, मुलांचे शिक्षण, यासाठी कर्ज घेतले. दुष्काळात पीक पदरात पडले. कर्जाचा डोंगर..आर्थिक विवंचना समाजात होणारी हेळसांड हीच कारणे आहे. या आत्महत्या थांबणार तरी कधी? हाच खरा प्रश्न आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारीपासून आजपर्यंत तब्बल 150 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचले. यात प्रमुख कारण हे कर्जबाजारीपणा, नापिकी, आणि दुष्काळ हेच आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यात सरकार अपयशी तर ठरत नाही ना? हा प्रश्न निर्मान होतोय.

दुष्काळी बीड जिल्ह्यातील हे आत्महत्येचे सत्र थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे. आजच्या तिन्ही घटना धक्कादायक आहेत. 65 वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकी व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून स्व:ताच्या शेतात राहत्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची आज दुपारी घडली.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेवराई तालुक्यातील सुशी येथील बाबासाहेब भगवानराव भांडवलकर (वय- 65) असे या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. गेवराई तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून सततच्या दुष्काळी परिस्थितीला व नापिकीला कंटाळून बाबासाहेब भांडवलकर यांनी घरापासून जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून स्वतःला संपवून घेतले.

Loading...

बाबासाहेब हे वारकरी होते दोनच दिवसांपूर्वी आषाढी एकादशीचे पांडुरंगाचे दर्शन करुन परत आले होते. मात्र, सततची नापिकी यामुळे आर्थिक विवंचना होती.असे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. बाबासाहेब भांडवलकर यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली, दुर्घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 10:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...