Elec-widget

सिलिंडरच्या स्फोटाने नाशिक हादरले.. 3 वर्षांच्या चिमुरड्यासह आई-वडिलांचा मृत्यू

सिलिंडरच्या स्फोटाने नाशिक हादरले.. 3 वर्षांच्या चिमुरड्यासह आई-वडिलांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नाशिक शहरात शोककळा...

  • Share this:

नाशिक,20 नोव्हेंबर : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 3 वर्षांच्या चिमुरड्यासह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. नाशिक रोड परिसरातील एकलहरा रोडवर असलेल्या संभाजीनगरातील भोर मळा येथे ही घटना घडली. स्फोटाची दाहकता एवढी भयानक होती की, कुटुंबातील सर्वच व्यक्ती गंभीररित्या होरपळले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना 3 वर्षांचा अथर्व, आई नम्रता कांबळे (वय-40) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर काल, मंगळवारी कुटुंबप्रमुख असलेले नरसिंग कांबळे (वय-44) यांचाचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेली माहिती अशी की, नाशिक रोड परिसरातील एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शनसमोर असलेल्या संभाजीनगरातील भोर मळा येथे नरसिंग कांबळे हे पत्नी, तीन मुलांसह वास्तव्य करत होते. शुक्रवारी त्यांच्या पत्नी नम्रता या नेहमीप्रमाणे सकाळी गॅस पेटवण्यासाठी गेल्या असता गळतीमुळे मोठा भडका उडाला. यात नम्रता यांच्यासह संपूर्ण कुटुंब गंभीररित्या होरपळले गेले. सगळ्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, गंभीररीत्या भाजल्याने रविवारी अथर्वाचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच सोमवारी 70 टक्के भाजले गेल्या नम्रता नरसिंग कांबळे यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या नातलगांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मंगळवारी कुटुंबप्रमुख असलेले नरसिंग कांबळे यांचाही मृत्यू झाल्याने फक्त नातलगच नव्हे, तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आता मुलगा निखिल नरसिंग कांबळे आणि नेहा नरसिंग कांबळे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com