Elec-widget

या महापौरांना दाऊद, छोटा शकीलच्या नावाने मिळाली जीवे मारण्याची धमकी

या महापौरांना दाऊद, छोटा शकीलच्या नावाने मिळाली जीवे मारण्याची धमकी

तुम्हाला चांगले राहायचे असेल तर ठाण्यात कोणाशी पंगा घेऊ नकोस, नाही तर तुला उचलून नेऊ, अशा शब्दात महापौर मीनाक्षी शिंदे यांनी फोनवरून धमकी देण्यात आली आहे.

  • Share this:

अजित मांढरे, (प्रतिनिधी)

ठाणे, 18 सप्टेंबर: ठाणे महापालिकेच्या महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे (रा. क्रांती व्यायाम शाळेसमोर, चितळसर, माणपाडा, ठाणे)यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या नावाने फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

तुम्हाला चांगले राहायचे असेल तर ठाण्यात कोणाशी पंगा घेऊ नकोस, नाही तर तुला उचलून नेऊ, अशा शब्दात महापौर मीनाक्षी शिंदे यांनी फोनवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मीनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मीनाक्षी शिंदे यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून (7304725709) फोन आला. 'मी डोंगरीहून दाऊदचा माणूस बोलतो आहे. तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करतात व व्यवस्थीत राहात नाही, तुम्ही निट राहिल्या नाही तर तुम्हाला उचलून नेऊ व तुमच्या कुटुंबियांना त्रास देऊ, एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या हिशोबात राहायचे, अशी दमदाटीही केली आहे.

धमकीवर काय म्हणाल्या महापौर?

Loading...

महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता धमकीचा फोन आला. एका महिलेला दाऊद इब्राहिम, छोटा शकीलचे नाव घेऊन अशा प्रकारची धमकी देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पुरुषार्थ संपत चालला आहे की काय. असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. धमकी देणाऱ्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी समोर यावे. समोर येऊन त्यांनी धमकी द्यावी, असेही मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...