MIMच्या विजयी रॅलीत पाण्याची नासाडी.. DJ च्या तालावर थिरकली मदमस्त तरुणाई

MIMच्या विजयी रॅलीत पाण्याची नासाडी.. DJ च्या तालावर थिरकली मदमस्त तरुणाई

मराठवाड्यात पाण्याची प्रचंड टंचाई असताना एमआयएमच्या विजयी रॅलीत डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मदमस्त तरुणाईवर टँकरद्वारे पाण्याचा फवारा मारत हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.

  • Share this:

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 29 जुलै- मराठवाड्यात पाण्याची प्रचंड टंचाई असताना एमआयएमच्या विजयी रॅलीत डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मदमस्त तरुणाईवर टँकरद्वारे पाण्याचा फवारा मारत हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे रविवारी (28 जुलै) आझाद चौक ते भडकला गेट अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हजारो दमस्त तरुण डीजेच्या तालावर थिरकत होते. या तरुणावर तब्बल 12 टँकरद्वारे पाणी फवारण्यात आले. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची उधळपट्टी केल्याने आता खासदार जलील यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत आहे, ते ही नूतन खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर हा प्रकार अनेक तास सुरू होता. विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांनी निवडणुकीमध्ये पाणी पुरवठ्याचा विषय ऊर फाटेपर्यंत मांडला होता. संसदेत ही त्यांनी शेतकरी प्रश्न आणि औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय मांडला आहे. विधानसभेत ही त्यांनी पाणी टंचाईचा विषय जोरदार मांडला होता. मात्र, खासदार जलील यांच्याच रॅलीत झालेल्या या गंभीर प्रकाराबद्दल कार्यकर्त्यांना काहीही बोलले नाही. पाण्याचा हा नासाडीचा खेळ स्वत:ही पाहत राहिले. दुपारी 4 वाजता निघालेली ही विजयी रॅली रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती.

चंद्रकांत खैरेंनी केली ही टीका..

दरम्यान, शहरात आठ-आठ दिवस नळाला पिण्याचे पाणी येत नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केल्यामुळे इम्तियाज जलील यांच्यावर चौफेर टीका होत आहे. एकीकडे संसदेत पाण्याचा प्रश्न मांडायचा आणि दुसरीकडे शहरातच पाण्याची नासाडी करायची ही इम्तियाज जलील यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

SPECIAL REPORT : 'कुंपणाने'च खाल्ले तब्बल 238 कोटी, पिंपरी चिंचवडमध्ये मोठा घोटाळा उघड

First published: July 29, 2019, 8:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading