S M L

पठ्याला भलतीच घाई... जन्म घेताच लागला चालायला!

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2017 11:55 AM IST

पठ्याला भलतीच घाई... जन्म घेताच लागला चालायला!

29 मे : टेक्नोलाॅजीच्या या जमान्यात अापण सहज बोलून जातो की, 'आज-कालची मुलं आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असतात'. पण या नवजात बाळाच्या बाबतीत काय बोलावं, असा प्रश्नच आम्हाला पडला आहे. या चिमुकल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलं नाही, पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंकाच नाही. आता तुम्ही म्हणाल असं काय केलं बरं या बाळाने? तर तुम्हीच बघाजन्माला आल्यावर डाॅक्टरांनी या चिमुकल्याला नुसतं उभं धरलं होतं, तर हा चिमुकला एक मिनिटाच्या आतच चालायला लागला...

तसं मुल जन्माला आलं की चालायला त्याला किमान वर्ष तरी लागतं. पण या पठ्याला कसली घाई कुणास ठाऊक, भाऊ जन्म घेताच चालायला लागला ना...

हे दृष्य पाहून डाॅक्टर अचंबित झाले आहेत.

Loading...
Loading...

हा व्हिडिओ 26 मेला फेसबूकवर अपलोड करण्यात आला आणि अवघ्या दोन दिवसात 53 लाखांहून अधिक लोकांनी हा पाहिलाय तर 1 लाखाहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2017 11:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close