Home /News /news /

Male Fertility: विवाहित पुरुषांची ताकद वाढवेल ही चटणी, जाणून घ्या करण्याची पद्धत

Male Fertility: विवाहित पुरुषांची ताकद वाढवेल ही चटणी, जाणून घ्या करण्याची पद्धत

गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव आणि वाढते ताण-तणाव या गोष्टी अनेक शारीरिक समस्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. या गोष्टींमुळे लैंगिक समस्या (Sexual Problems) निर्माण होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे.

    नवी दिल्ली, 14 मे : गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव आणि वाढते ताण-तणाव या गोष्टी अनेक शारीरिक समस्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. या गोष्टींमुळे लैंगिक समस्या (Sexual Problems) निर्माण होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. विवाहानंतरचं जीवन सुखी असावं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं; पण वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर शारीरिक कमजोरी (Physical Weakness) जाणवू लागल्यानं वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. वयापरत्वे लैंगिक सुखात कमतरता निर्माण होते. अर्थात याचा परिणाम नात्यावरही होतो. रोजच्या आहारात (Diet) काही बदल केल्यास या समस्येवर सहज मात करता येऊ शकते. या समस्येवर आपल्या खाद्य संस्कृतीत एक उपाय सांगितला गेला आहे. आहारात कांदा-लसूण चटणीचा (Onion -Garlic Chutney) समावेश केल्यास शारीरिक कमजोरी दूर होते आणि वैवाहिक जीवन (Marital Life) सुखमय होते. या चटणीची खास अशी रेसिपी आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, कांदा (Onion) आणि लसूण (Garlic) विवाहित पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. कांदा आणि लसूण चटणी खाल्ल्यास पुरुषांमधल्या लैंगिक समस्या दूर होऊ शकतात. कांद्याच्या सेवनाने पुरुषांची प्रजनन (Fertility) क्षमता वाढते. फर्टिलिटीशी संबंधित समस्यांचं निवारण होतं. कारण कांद्यामुळे टेस्टोस्टेरॉन हा हॉर्मोन (Testosterone Hormone) वाढतो आणि स्टॅमिना सुधारण्यास मदत होते. लसणातील अ‍ॅलिसिन (Allicin) या घटकामुळे शरीरातला रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे नपुंसकत्वाचा धोका कमी होतो आणि शुक्राणूंची संख्यादेखील वाढते. त्यामुळे लैंगिक समस्या दूर करण्यासाठी कांदा आणि लसूण चटणीचा हा घरगुती उपाय निश्चितच फायदेशीर ठरू शकतो. कांदा आणि लसूण चटणीची रेसिपी (Recipe) अत्यंत सोपी आहे. कांदा-लसूण चटणी करण्यासाठी एक मोठा कांदा, लसणाच्या पाच पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा काळं मीठ, दोन छोटे टोमॅटो, लिंबाचा रस, अर्धा चमचा साखर, एक चमचा भाजलेलं जिरं आणि चवीनुसार पांढरं मीठ हे साहित्य घ्यावं. चटणी करण्यासाठी कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो मंद आचेवर तळून घ्यावेत. त्यानंतर या सर्व भाज्या मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्याव्यात. त्यानंतर ही चटणी मिक्सरमधून भांड्यात काढून घ्यावी. त्यानंतर चटणी चमच्याने एकत्र करून घ्यावी. चटणी बेचव वाटत असेल तर त्यात चवीनुसार थोडं मीठ घालावं आणि चटणी जेवणासोबत सर्व्ह करावी. एकूणच या घरगुती उपायामुळे लैंगिक जीवनातली समस्या दूर होऊन, वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद निर्माण होऊ शकतो.

    First published:

    Tags: Sexual health

    पुढील बातम्या