मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी हमखास करा हे सोपे उपाय, नक्की होईल फायदा

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी हमखास करा हे सोपे उपाय, नक्की होईल फायदा

अगदी साध्या सोप्या सहज घरगुती उपायाकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. आम्ही तुम्हाला असाच एक अगदी सोपा उपाय सांगणार आहोत.

अगदी साध्या सोप्या सहज घरगुती उपायाकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. आम्ही तुम्हाला असाच एक अगदी सोपा उपाय सांगणार आहोत.

अगदी साध्या सोप्या सहज घरगुती उपायाकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. आम्ही तुम्हाला असाच एक अगदी सोपा उपाय सांगणार आहोत.

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: बाळंतपणानंतरचे पोटाला, कंबरेला पडलेले स्ट्रेच मार्क्स (Strech Marks) हा अनेक महिलांसाठी त्रासाचा विषय असतो. हे स्ट्रेच मार्क खूप वाईट दिसतात. ते घालवण्यासाठी अनेक क्रिम्स वगैरे वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण अगदी साध्या सोप्या सहज घरगुती उपायाकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. आम्ही तुम्हाला असाच एक अगदी सोपा उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स अगदी पूर्ण जाऊ शकतील.

स्ट्रेच मार्क घालवायचे असतील तर कॅस्टर ऑईल (Castor Oil) म्हणजेच एरंडेल तेलाचा वापर नक्की करून बघा. हा एक हमखास उपाय आहे. याबद्दलच टीव्ही 9 भारतवर्षनं अधिक माहिती दिली आहे.

हेही वाचा-  मेंदूसंबंधी आजार दूर करण्यासाठी होणार गणिताची मदत;IIT वैज्ञानिकांनी लावला मोठा शोध

 एरंडेल तेलात असंतृप्त म्हणजे unsaturated ओमेगा- 9 फॅट ॲसिड असतं. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज आणि कंडिशन होते. आता हे एरंडेल कसं वापरायचं ते बघूया-

- एरंडेल आणि लवंग इसेन्शियल (Clove Essential OIl) ऑईल- लवंगाच्या तेलामुळेही स्ट्रेच मार्क कमी व्हायला मदत होते. एका वाटीमध्ये लवंगाचं तेल तीन चमचे आणि एक मोठा चमचा एरंडेल मिसळा. हे मिश्रण चांगलं एकत्र करा आणि स्ट्रेच मार्क असलेल्या जागेवर लावून मसाज करा. रात्रभर तसंच राहू द्या. हा उपाय रोज करा.

- एरंडेल (Castor Oil) आणि खोबरेल तेल (Coconut Oil)- नारळाचं तेल हे सर्वात चांगलं नैसर्गिक मॉइश्चरायझर (Moisturiser) आहे, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. आरोग्याच्या दृष्टीनंही खोबरेल तेल त्वचेवर चांगला परिणाम करते. स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी खोबरेल तेलाचा नक्की उपयोग होतो. एरंडेल आणि खोबऱ्याचं तेल एका वाटीत एकत्र घेऊन ते चांगलं मिसळा आणि गरम करा. आता हे मिश्रण स्ट्रेच मार्क असलेल्या जागेवर लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. हे तेल तुम्ही नियमितपणे लावू शकता.

- एरंडेल (Castor Oil) आणि कोरफड (Allovera)- कोरफडीमुळे कोलेजनची निर्मिती होते. त्याशिवाय ते चांगल्या मॉइश्चरायझरचंही काम करतं. रोज हे वापरल्यानं स्ट्रेच मार्क्स कमी होतात. एक चमचा ताजं ॲलोव्हेरा म्हणजे कोरफड जेल घ्या आणि त्यात एक मोठा चमचा एरंडेल मिसळा. हे दोन्ही चांगलं एकत्र करा. स्ट्रेच मार्क असलेल्या जागेवर या मिश्रणानं 10 मिनिटं मसाज करा. रात्रभर हे तसंच राहू द्या. तुम्ही हा उपाय रोजही करू शकता.

हेही वाचा-  सावधान! थंडीपासून वाचण्यासाठी रूम हीटरचा वापर करताय? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

तुमचे स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी हे अगदी सोपे आणि घरगुती उपाय नक्की करुन बघा.

First published:

Tags: Lifestyle