ज्या व्यक्तीला मोदी करतात फॉलो, त्याने 10 तासांआधीच सांगितली होती हल्ल्याची माहिती

'इम्रान भाई त्याचा काहीही फायदा नाही आहे. आज रात्री असाही हल्ला होणार आहे. त्यामुळे काळजी घ्या.'

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 08:55 PM IST

ज्या व्यक्तीला मोदी करतात फॉलो, त्याने 10 तासांआधीच सांगितली होती हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाक व्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला आणि आपल्या 42 शहीद जवानांच्या जाण्याचा बदला घेतला. भारतीय वायुसेनेच्या या हवाई हल्ल्यामध्ये तब्बल 300पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात येत आहे. पण या सगळ्यात सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल होतं आहे.


सोमवारी मध्यरात्री पाक व्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करण्यात आला. म्हणजेच 25 आणि 26 फेब्रुवारीच्या रात्री. याआधी ट्विटरवर 'The Skin Doctor' नावाच्या एका यूजरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका ट्वीटला उत्तर दिलं आहे. यूजरी माहिती मिळवली असता तो सैन्यात त्वचा तज्ज्ञाचं काम करतात.

इम्रान खान यांनी 25 फेब्रुवारीला सायंकाळी 4:47 वाजता ट्वीट केलं. त्यावर उत्तर देत The Skin Doctor  नावाच्या यूजरने ट्वीट केलं की, 'इम्रान भाई त्याचा काहीही फायदा नाही आहे. आज रात्री असाही हल्ला होणार आहे. त्यामुळे काळजी घ्या.'


भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर हे ट्वीट खूप व्हायरल होत आहे. या ट्वीटला 873 लोकांनी रिट्वीट केलं तर 2400 लोकांनी याला लाईक केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे The Skin Doctor यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात.

सगळ्यात मोठी बातमी: पाहा, भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या बातम्या विदेशी मीडियाने कशा दाखवल्या

असा झाला Air Strike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

Air Strikeचा निर्णय मोदींचा

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या : AirStrikes करण्याआधी भारताने वापरले हे ड्रोन, पाकचे रडार झाले ठप्प

12 दिवसामध्ये मोदींचे पाकला सहा मोठे धक्के

- पुलवामा हल्ल्यामध्ये 100 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

- मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.

- मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. याप्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.

- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.


IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close