'हा काही दाऊदच्या बायकोने केलेला मला फोन नाही', भाजप नेत्याची टोलेबाजी, पाहा हा VIDEO

'हा काही दाऊदच्या बायकोने केलेला मला फोन नाही', भाजप नेत्याची टोलेबाजी, पाहा हा VIDEO

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांना धमकीचा फोन येणे ही गंभीर बाब आहे.

  • Share this:

मुक्ताईनगर, 08 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन येणे ही गंभीर बाब आहे, अशी चिंता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. तसंच, हा काही नाथाभाऊंना दाऊदच्या बायकोने फोन  केला, असा गंमतीशीर विषय नसून याची गंभीरता ओळखून याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणीही  एकनाथराव खडसे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांना धमकीचा फोन येणे ही गंभीर बाब असून मुख्यमंत्र्यांना जर धमकी देण्याचे धारिष्ट करत असेल तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान आहे. त्यामुळे सरकार समोर एक आव्हान आहे की हा फोन करणार कोण आहे. कोणत्या कारणासाठी त्यांनी फोन केला यातील गंभीरता किती आहे हे समाजासमोर लवकरात लवकर आला पाहिजे, असंही खडसे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना व शरद पवार यांना अशाप्रकारे फोन आल्याने संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ होतो. यातील तथ्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ही अस्वस्थता दूर होणार नाही. खरंतर हा खोडकरपणा करण्याचा प्रयत्न असेल. मात्र,  सहजासहजी हा प्रकार घेता येणार नाही. तो काही नाथाभाऊंना दाऊदच्या बायकोने फोन केला अशा पद्धतीचा गंमतीचा प्रयोग नसावा त्यात काहीतरी गंभीरता असेल, त्याची खात्री करणे गरजेचे आहे. कारण सर्वांचे जीवन सुरक्षित राहण्याची जबाबदारी ही आपल्या सरकारची आहे, असंही खडसे म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: September 8, 2020, 2:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या