India vs Australia 1st Test- टीम विराटने असा सेलिब्रेट केला ऐतिहासिक विजय

मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला 'मोस्ट डिपेंडेबल प्लेअर' चेतेश्वर पुजारा

  • Share this:

भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

आर. अश्निनने हेजलवूडला बाद करत भारतासाठी विजय सुकर करुन दिला. भारतासाठी जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर इशांत शर्माने १ गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियासाठी फलंदाज शॉन मार्शने सर्वाधिक ६० धावा केल्या. मार्शशिवाय कोणत्याही फलंदाजाने ४० च्या पुढे धावा केल्या नाहीत.

शॉन मार्शशिवाय कर्णधार टिम पेनने ४१ धावा केल्या. नाथन लायनने नाबाद ३८ धावा केल्या. पॅट कमिंस आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी २८ धावा केल्या.

मार्कस हॅरिसने २६ आणि शेवटचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या जोश हेजलवुडने १३ धावांची खेळी खेळली.

भारतासाठी चेतेश्वर पुजाराने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पहिल्या डावात १२३ धावा तर दुसऱ्या डावात ७१ धावा करुन भारतासाठी धावांचा डोंगर उभा करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

मॅन ऑफ दी मॅच म्हणून त्याचा गौरवही करण्यात आला.

भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने एक इतिहास रचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात तब्बल १० वर्षांपूर्वी धूळ चारली होती. २००८ मध्ये झालेल्या पर्थ कसोटीत भारताने विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्यापासूनच मजबूत पकड निर्माण केली आहे.

या विजयासोबत कोहली इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला.

भारताने दुसऱ्या डावात ३०७ धावा केल्या . पहिल्या डावातील १५ धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३२३ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

चौथ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताने ३ बाद १५१ धावांहून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४० धावांवर नाबाद असणाऱ्या चेतेश्वर पुजाऱ्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. अर्धशतक केल्यानंतर पुजारा ७१ धावांवर बाद झाला.

अजिंक्य रहाणेनेही चांगली खेळी करत ७० धावा केल्या. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित फक्त १ धाव घेऊन बाद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 11:33 AM IST

ताज्या बातम्या