मुंबई, 5 जानेवारी : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये विविध कारणांमुळे तू तू मै मै सुरू आहे. यामध्ये आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर विविध कारणांनी टीका केली. सध्या राज्यात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. यामुळे शिवसेना अडचणीत आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यावर फडणवीस यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते यावेळी म्हणाले की, ही सगळी नाटक कंपनी आहे. शिवसेना-काँग्रेस हे सर्व ठरवून करत आहे. निवडणुका जवळ आल्याने ही नुराकुश्ती सुरू झाली आहे. औरंगाबाद विमानतळाच्या मुद्द्यावरुन ते म्हणाले की, आज इतके वर्ष सत्तेत असूनही त्यांना काही करता आलेले नाही, हे नुसते पत्र पाठवतात. यावेळी त्यांनी संजय राऊंतावर निशाणा साधला.
फडणवीस आणि काय म्हणाले...
-(गुजराती भाषिक मेळावा शिवसेना ) - निवडणुकी निमित्ताने का होईना गुजराती समाजाची आठवण झाली आहे
-राष्ट्रीय प्रोटोकॉल ठरला आहे, त्याप्रमाणे काम करायचं आहे. गरीबाला मोफत लस द्यायला हवी असं आमचं म्हणणं आहे
-राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यावरही फडणवीस टीका करीत म्हणाले की, राज्यातले पोलीस असं वागतात हे बघून आश्चर्य वाटत आहे, आरोपीचे नाव घेण्याचीसुद्धा पोलिसांना लाज वाटत आहे.
-गिरीश महाजन यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केलेली आहे. जुने प्रकरण आहे, 3 वर्षापूर्वीचे आहे, गिरीश महाजन याबाबत उच्च न्यायालयात गेले होते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.