वेलिंग्टन, 24 डिसेंबर : कुत्रा ( dogs ), मांजर (Cat) यासारखे प्राणी पाळण्याचाा शौक अनेकांना असतो. कुत्रा एकनिष्ठ व प्रामाणिक समजला जातो. पण घरामध्ये सर्वात जास्त लाड करून घेते ती मांजरच. पायात घुटमळणारी आणि लळा लावणारी मांजर अनेक घरांचाच एक भाग झालेली असते. मात्र, तुम्ही पाळलेली मांजर जर चोरी करीत असेल तर ? नुसत्या विचारानेच धक्का बसला ना ? पण न्यूझीलंडमध्ये (New Zealand) एक अशी मांजर आहे, जी चोरी करते. एकदातर तिने चोरी करून अशी गोष्ट आणली की ज्यामुळे तिच्या मालकाला पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिलं आहे.
लोकांच्या चोरीच्या सवयींबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असेल, पण न्यूझीलंडची एक मांजरही अट्टल चोर म्हणून प्रसिद्ध होऊ लागली आहे. या मांजरीला तिच्या मालकाच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलांचे अंडरगारमेंट, शूज आणि चप्पल चोरण्याचा शौक आहे. पण नुकतेच या मांजरीने असे काही चोरून आणले की थेट पोलिसांनाच या मांजराच्या मालकाची चौकशी करावी लागली.
पोलिसांपर्यंत गेले प्रकरण
'इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्चमध्ये (Christchurch) राहणाऱ्या गिन्नी आणि डेव्हिड रम्बोल्डच्या (Ginny & David Rumbold) पाच महिन्यांच्या मांजरीला चोरीची सवय आहे. किथ (Keith) असं तिचं नाव असून तिच्या चोरीच्या सवयीमुळे या दोघांना अनेकवेळा दुसऱ्यांसमोर अपराध्यासारखं वाटतं. मात्र नुकतेच या मांजरीने असे काही चोरून आणले की, प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. तिने एक पिशवी चोरून आणली, जेव्हा डेव्हिडने ती उघडली तेव्हा त्यात पांढरी पावडर आढळली. ही पावडर म्हणजे ड्रग्ज होते. डेव्हिडने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त केले. पण मांजरीच्या या सवयीची माहिती मिळताच एक पोलीस अधिकारी चेष्टेने म्हणाला, 'आम्ही ड्रग्ज जप्त करत आहोत आणि किथला ही बॅग कुठून मिळाली याबद्दल तिच्याकडे विचारपूस करणार आहोत.'
मांजरीच्या या सवयीबद्दल तिचा मालक डेव्हिड म्हणतो, 'ती रोज काहीतरी घेऊन येत असते. कधी ती कोणाची ब्रा आणते, कधी जवळच्या नदीतून जिवंत मासा. तिला लेडीज अंडरगारमेंट्स चोरण्याचा शौक आहे. मी तिला अनेकदा म्हणतो, तुला हिरा आणायचा असेल तर हिरा आण, पण आजपर्यंत तिने माझे ऐकलेले नाही.'
हे ही वाचा-बिकिनी घालून कॉफी सर्व्ह करणाऱ्या युवतीला करावा लागतोय अडचणींचा सामना
घरात कोंडून राहणे आवडत नाही
मांजरीच्या या सवयीचा तिच्या मालकाला सुरुवातीला खूप त्रास झाला. पण आता त्याला याची सवय झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे शेजाऱ्यांनाही मांजरीच्या या सवयीचा राग येत नाही. डेव्हिडने त्याच्या घराबाहेर दोन बॉक्स ठेवले आहेत, ज्यामध्ये तो मांजरीने चोरलेल्या वस्तू ठेवतो. या वस्तू ज्याच्या असतील, त्यांना त्या घेऊन जाता याव्यात, यासाठी त्याने हे बॉक्स ठेवले आहेत. या मांजरीला घरात कोंडून राहणे अजिबात आवडत नाही. जेव्हा डेव्हिड तसा प्रयत्न करतो, तेव्हा ती घरात नासधूस करते.
मांजर पाळण्याची आवड अनेकांना असते. घरामध्ये पाळीव प्राणी असला म्हणजे घरातील वातावरण आनंदी राहते, अशीही समजूत त्यामागे आहे. परंतु न्यूझीलंडमध्ये पाळलेल्या मांजरीला चोरी करण्याची सवय लागल्याने तिच्या मालकाला थेट पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cat, Dog, Viral news