गडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : कमांडोंच्या कारवाईत 16 माओवाद्यांचा खात्मा

नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या सी-60 कमांडोंनी केलेल्या कारवाईत आज 16 माओवादी ठार झाले. भामरागडच्या जंगलात ही घटना घडली.

  • Share this:

गडचिरोली,ता.22 एप्रिल: नक्षलवाद्यांच्या विरोधातल्या सी-60 कमांडोंनी केलेल्या कारवाईत आज 16 माओवादी ठार झाले.

माओवाद्यांच्या विरोधातल्या कारवाईतचं हे मोठं यश समजलं जातं. संपूर्ण अहिरी दलम या संघटनेच्या माओवाद्यांचा यात समावेश आहे. श्रीनिवास आणि साईनाथ हे नक्षल्यांचे दोन कडवे नेते यात मारले गेले अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिलीय. या दोघांवरही 50 लाखांचं बक्षीस होतं. महाराष्ट्र, छत्तिसगड आणि आंध्र प्रदेशचे पोलिस यांच्या मागावर होते. या तीनही राज्यांमध्ये या दलमनं धुमाकूळ घातला होता.

भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात ही चकमक झाली. गडचिरोली जिल्ह्यातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

First published: April 22, 2018, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading